Cotton Cultivation Method : अकोल्यातील शेतकरी दिलीप ठाकरे यांनी विकसित केलेली 'सघन कापूस लागवड पद्धत' आता देशभर राबवली जाणार आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक उत्पादन देणाऱ्या या पद्धतीची केंद्र सरकारने दखल घेतली आहे.(Cotton Cultivation Method)
कापूस उत्पादन वाढवून २०३० पर्यंत आयात थांबवण्याचे आणि निर्यात वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांना नवे बळ देणारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम देशभरात नवा अध्याय लिहिणार आहे.(Cotton Cultivation Method)
कापूस उत्पादनात नवा मैलाचा दगड ठरलेल्या अकोल्यातील शेतकरी दिलीप ठाकरे यांच्या 'सघन कापूस लागवड पॅटर्न' ला केंद्र सरकारकडून देशभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Cotton Cultivation Method)
या पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनात तब्बल ४० टक्क्यांनी वाढ होत असून, २०३० पर्यंत देशातून कापसाची आयात थांबवून निर्यात वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.(Cotton Cultivation Method)
कोईम्बतूर येथे पार पडलेल्या चर्चासत्रात केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान आणि केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरीराजसिंह यांनी या पद्धतीच्या देशव्यापी अंमलबजावणीची घोषणा केली.(Cotton Cultivation Method)
अकोल्यातून देशभर मार्गदर्शन
अकोला जिल्ह्यातील मालवाडा (ता. बाळापूर) येथील शेतकरी दिलीप ठाकरे हे गेल्या १० वर्षांपासून सघन लागवड पद्धतीने कापूस घेत आहेत. विविध देशांत शेतीच्या आधुनिक तंत्राचा अभ्यास करून त्यांनी ही पद्धत विकसित केली.
त्यांच्या या पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीत एकरी ५–७ क्विंटल कापसाचे उत्पादन मिळते, तेच सघन पद्धतीत १५ क्विंटलांपर्यंत जाते.
काय आहे 'सघन कापूस लागवड पॅटर्न'?
* पारंपरिक पद्धतीत एका एकरामध्ये सरासरी १० हजार झाडे लावली जातात.
*सघन पद्धतीत एका एकरामध्ये तब्बल २९ हजार झाडे लावली जातात.
*जास्त झाडे असल्याने कापसाच्या बोंडांची संख्या व झाडांचा परिमाण वाढतो, परिणामी उत्पादनात मोठी वाढ होते.
देशभर अंमलबजावणीचे उद्दिष्ट
२०३० पर्यंत कापूस आयात थांबवणे.
कापूस निर्यातीत वाढ करून शेतकऱ्यांना अधिक दर मिळवून देणे.
योग्य वाणांचे संशोधन, माती आरोग्य सुधारणा व यांत्रिकीकरणावर भर.
पारंपरिक पद्धतीत एकरी ५–७ क्विंटल, सघन पद्धतीत १५ क्विंटल उत्पादन.
अकोल्याच्या शेतकऱ्याच्या पद्धतीचा केंद्र सरकारकडून देशभर विस्तार.
अतिसघन पद्धती देशभर राबवून शेतकऱ्यांना उत्पादनात क्रांती घडवून देणार आहोत. अकोल्याचा पॅटर्न इतर राज्यांतही विस्तार केला जाणार आहे. - शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री
पारंपरिक पद्धतीने एका एकरामध्ये शेतकरी कपाशीची दहा हजार झाडे लावतात. या पॅटर्नमध्ये एका एकरात २९ हजार झाडे लावण्यात येतात. जास्त झाडे लावल्यामुळे उत्पादनात वाढ होते. पारंपरिक पद्धतीने कापूस लागवड केल्यास एकरी ५ ते ७ क्विंटल उत्पादन होते. सघन पद्धतीने लागवड केल्यास एकरी १५ क्विंटल उत्पादन होते. - दिलीप ठाकरे, कापूस उत्पादक शेतकरी, अकोला