Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Cotton in Paddy Crop : 'प्रयोगशील शेती' : एकाच शेतात धानाबरोबरच कापूस, वाचा सविस्तर  

Cotton in Paddy Crop : 'प्रयोगशील शेती' : एकाच शेतात धानाबरोबरच कापूस, वाचा सविस्तर  

Latest news Cotton cultivation in rice farming, experiment of farmers in Gadchiroli district, read in detail | Cotton in Paddy Crop : 'प्रयोगशील शेती' : एकाच शेतात धानाबरोबरच कापूस, वाचा सविस्तर  

Cotton in Paddy Crop : 'प्रयोगशील शेती' : एकाच शेतात धानाबरोबरच कापूस, वाचा सविस्तर  

Agriculture News : अनेक शेतकऱ्यांनी आता त्याच शेतीत कापूस पिकाची लागवड करण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे.

Agriculture News : अनेक शेतकऱ्यांनी आता त्याच शेतीत कापूस पिकाची लागवड करण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे.

गडचिरोली : धान पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यात आता शेतीत मोठे बदल होताना दिसत आहेत. मुख्य खरीप पीक असलेल्या धानासोबतच तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आता त्याच शेतीतकापूस पिकाची लागवड करण्याचा नवा प्रयोग सुरू केला आहे.

परंपरेनुसार धान शेतातील 'पाळ्यांवर' पूर्वी पोपट, वाल किंवा तूर यासारखी आंतरपिके घेतली जात असत. मात्र, गेल्या चार-पाच वर्षापासून चामोर्शीतील शेतकरी एकाच हंगामात आणि एकाच शेतजमिनीत पर्यायी नगदी पिकांची लागवड करण्याकडे वळले आहेत. 

यात, धान पिकाची लागवड असलेल्या शेतजमिनीतील पाळ्यांवर त्यांनी कपाशीची लागवड केली आहे. कापसाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी कापूस पिकाकडे वळला आहे. 

पिके रोगाने ग्रासली
सध्या शेतीत धानाचे पीक 'निसव्यावर' (फुलोर अवस्था) आले आहे, तर कपाशी पिकाला बोंड लागणे सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी कपाशीचे पीक जोमात दिसत असले तरी, थानपीक तुलनेने कमजोर असल्याचे चित्र आहे. दुर्दैवाने, एकाच शेतात उगवलेली ही दोन्ही पिके सध्या रोगांनी ग्रासलेली दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकरी सध्या पिकांवर फवारणी करताना दिसत आहेत.

निसर्गाची साथ आवश्यक
सध्या कपाशी फुटण्याचे प्रमाण २५ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर काही ठिकाणी ५० टक्के पीक फुटलेले दिसत आहे. एकाच वेळी, एकाच शेतात दोन महत्त्वपूर्ण पिके घेऊन तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली प्रयोगशीलता सिद्ध केली आहे, मात्र या बदलाला निसर्गाची साथ मिळते की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
 

Web Title: Latest news Cotton cultivation in rice farming, experiment of farmers in Gadchiroli district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.