Cotton Crop Damage : ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप हंगामाचे मोठे नुकसान केले असतानाच, आता वेचणीस आलेल्या कापसावरही पावसाचा मारा होत आहे.(Cotton Crop Damage)
सलग तीन दिवस चालू असलेल्या पावसामुळे शेतातच कापूस भिजत असून, त्याच्या वाती होऊ लागल्या आहेत. परिणामी, उत्पादन घटणारच नाही तर गुणवत्तेतही घसरण होऊन बाजारभाव कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Cotton Crop Damage)
सोयाबीन गेलं, आता कापूसही गेला!
मागील दोन महिन्यांत अतिवृष्टीने हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक पूर्णपणे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापसावर शेवटची आशा ठेवली होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या पावसाने तो धक्का बसल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचला आहे.
भिजलेल्या कापसाची वेचणी किमान चार ते सहा दिवस थांबवावी लागणार असून, वेचणी केली तरी कापूस पिवळा पडण्याची शक्यता आहे. व्यापारी भिजलेला कापूस विकत घ्यायला तयार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
'सीसीआय' केंद्रांचा मुहूर्तच सापडत नाही
शेतकऱ्यांनी पहिली वेचणी पूर्ण केली असून, विक्रीसाठी कापूस तयार आहे. परंतु भारतीय कापूस महामंडळाचे (CCI) खरेदी केंद्र अजून सुरू झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारातच कापूस विकावा लागत आहे. या ठिकाणी व्यापारी कापसाला कवडीमोल दरात खरेदी करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
नैसर्गिक संकटांमुळे मेटाकुटी
जुलै महिन्यात उघडीप, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, आता ऑक्टोबरअखेरीस पुन्हा पावसाचा मारा या चक्रात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आल्याने पिकांसह सुपीक माती वाहून गेली, काहींची गुरेही दगावली.
| तालुका | लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये) | 
|---|---|
| वसमत | २,९४९ | 
| कळमनुरी | ९,१०५ | 
| हिंगोली | ६,४३४ | 
| औंढा नागनाथ | १,४१४ | 
| सेनगाव | ६,९२१ | 
| एकूण | ३७,२५९ | 
शेतकऱ्यांची हतबल प्रतिक्रिया
कापूस शेतातच वाया जातोय. सीसीआय केंद्रं सुरू झाली नाहीत, व्यापारी काहीही भाव देताहेत. हा पाऊस आता उपजीविकाच हिरावून नेतोय.अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.
शेतकऱ्यांना सल्ला
* पावसात भिजलेल्या कापसाची त्वरित वाळवण प्रक्रिया करावी.
* कापसाच्या ढिगाऱ्यांवर प्लास्टिक शीट टाकून ओलावा टाळावा.
* वेचणी थांबवून ३–४ दिवस उन्हाचा अंदाज आल्यावरच विक्री करावी.
* जिल्हा कृषी विभागाशी संपर्क ठेवून सीसीआय केंद्रांबाबत अद्ययावत माहिती घ्यावी.
