Join us
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल लवकरच, अकरावी ॲडमिशनसाठी कुठली कागदपत्रे लागतात, 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 12:36 IST

Maha 10th Results : दहावी पास झालेल्या आणि अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष तयारी करावी लागते.

जळगाव : बारावीचा निकाल जाहीर झाला असून पुढील आठवड्यात दहावी चा निकाल लागण्याची शक्यता आहे. दहावीनंतर महत्वाची पायरी असलेल्या अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश घेणे आवश्यक असते. ही अकरावी प्रवेशप्रक्रिया लवकरच सुरू होईल. 

यासाठी दहावी पास झालेल्या आणि अकरावीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विशेष तयारी करावी लागते. त्यामध्ये अकरावी प्रवेशासाठी कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. त्यामुळे कागदपत्रांची यादी किंवा तयार आधीच करावी लागते, या प्रवेशासाठी काय काय नियोजन करावे हे पाहुयात... 

राज्य मंडळाशी संलग्न सर्व उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीनेच प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. अन्य कोणत्याही मार्गाने प्रवेश दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट सांगण्यात आले.

अशी राहणार प्रवेशप्रक्रियाऑनलाइन पोर्टलवर नोंदणी, वैयक्तिक माहिती गुण भरा, पसंतीच्या कनिष्ठ महाविद्यालयांची निवड करावी लागणार आहे. प्रवेशासाठी कॅप आणि विविध कोटा (आरक्षण) अशा दोनच पद्धती आहेत. यात मागासवर्गीय, अल्पसंख्याक, व्यवस्थापन कोटा असेल ही संपूर्ण प्रक्रिया संगणकीकृत आहे.

ही कागदपत्रे तयार ठेवादहावीची गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (लागू असल्यास) उत्पन्नाचा दाखला, प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, विशेष आरक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे.

गुणवत्तेनुसार प्रवेशअकरावी प्रवेश ऑनलाइन पद्धतीने होणार असून, गुणवत्तेनुसार व निर्धारित निकषाच्या आधारावर राबविली जाणार आहे. शेवटच्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळेपर्यंत प्रक्रिया राबविली जाणार आहे.

 

 

 विहिरीत सापडली चौदाव्या शतकातील गधेगळ, गधेगळ म्हणजे काय, त्याच इतिहासात काय महत्व?

 

English
हिंदी सारांश
Web Title : Prepare Documents for Eleventh Grade Admissions After Tenth Result

Web Summary : Tenth result is expected soon. Eleventh grade admissions will begin shortly via online process. Students need tenth mark sheet, school leaving certificate, caste certificate (if applicable), income proof, Aadhar card and passport photo. Admissions will be merit-based.
टॅग्स :शेती क्षेत्रप्रवेश प्रक्रियापरिणाम दिवसशेतकरीविद्यार्थी