Chickpea Diseases Management : रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या हरभऱ्यावर बुरशीजन्य व विषाणूजन्य खुजा, मुळकूज आणि मर या रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. (Chickpea Diseases Management)
अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात वाढलेल्या आर्द्रतेसोबतच बीजप्रक्रियेचा अभाव आणि पिकांच्या फेरपालटाचे पालन न केल्याने या रोगांची तीव्रता अधिक वाढली आहे. (Chickpea Diseases Management)
योग्य वेळी नियंत्रण न केल्यास उत्पादनात १० ते १००% पर्यंत घट येण्याचा इशारा कृषी विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकात्मिक रोगव्यवस्थापनाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. (Chickpea Diseases Management)
पण रोगाचा मोठा धोका
अमरावती जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात जवळपास १ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. मात्र जमिनीत आर्द्रता अधिक असताना अनेक शेतकऱ्यांनी घरगुती, प्रोसेस न केलेले बियाणे वापरल्याने रोगांचा प्रादुर्भाव वेगाने वाढला आहे. विशेषत: काळी परिसरात मर रोगाने मोठे नुकसान झाले आहे.
मर रोग अत्यंत धोकादायक
मर हा रोग फ्युजारियम या जमिनीत राहणाऱ्या बुरशीमुळे पसरतो. हा रोग पिकाच्या कोणत्याही वाढीच्या अवस्थेत होऊ शकतो.
लक्षणे
पानं पिवळी पडणे
झाडे कोमेजणे
शेंडे मलूल होणे
झाडे उपटल्यास मुळांचा भाग बारीक आणि तपकिरी दिसणे
झाडाच्या खोडात काळी उभी रेघ दिसणे
फुलोऱ्याच्या काळात हा रोग झाल्यास पिके एका रात्रीत मरतात, असे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
मुळकूज रोगाचाही प्रादुर्भाव वाढला
जमिनीत आर्द्रता वाढणे आणि पेरणीनंतर हवामान बदलल्याने मुळकूज रोगानेही रोपे मरत आहेत.
लक्षणे
रोपे ४–६ आठवड्यात कोमेजणे
पानं पिवळी होणे
मुळाशी पांढरी बुरशी दिसणे
रोप सहज उपटले जाणे
तज्ज्ञांनी सांगितले की, मुळकूज टाळण्यासाठी पिकांची फेरपालट आवश्यक आहे आणि रोगट शेतात सतत हरभरा पेरणे हानिकारक ठरते.
खुजा रोग - मावा व तुडतुड्यांमुळे पसरणारा विषाणूजन्य अटॅक
खुजा हा हरभऱ्याचा पिवळसर बुटकेपणा आणणारा विषाणू आहे. या विषाणूमुळे होतो आणि मावा व तुडतुड्यांमुळे वेगाने पसरतो.
लक्षणे
देशी हरभऱ्यात पानं लालसर
काबुलीत पिवळसर रंग
पानांचा आकार लहान
फांद्यांमधील अंतर कमी
झाडाची वाढ खुंटणे
फुलधारणा कमी
सप्टेंबरमधील पेरण्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसत आहे.
पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अत्यावश्यक
कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे बीजप्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे
बीजप्रक्रिया
टेबुकोनॅझोल ५.४% (WS) – ४ मिली
ट्रायकोडर्मा – ४० ग्रॅम
प्रति १० किलो बियाणे
किंवा
प्रोक्लायस (टेबुकोनॅझोल ५.७% + १.४%) (ES)
३ मिली प्रति १० किलो बियाणे
४० ग्रॅम ट्रायकोडर्मा
ही प्रक्रिया केल्यास जमिनीतील बुरशीजन्य रोग नियंत्रित राहतात आणि उत्पादन सुरक्षित होते.
व्यवस्थापन न केल्यास मोठे नुकसान निश्चित
रोग नियंत्रणासाठी एकात्मिक उपाय न केल्यास
१० ते १००% उत्पादनात घट
फुलोऱ्यानंतर झाडे मरून जाणे
आर्थिक नुकसान वाढणे असे गंभीर परिणाम दिसू शकतात.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना नियमित शेत पाहणी, मावा नियंत्रण आणि योग्य बुरशीनाशक फवारणी करण्याचे आवाहन केले आहे.
