Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > चारा साठविण्यासाठी लगबग, एक टन मक्याची कुट्टी भरण्यासाठी 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च

चारा साठविण्यासाठी लगबग, एक टन मक्याची कुट्टी भरण्यासाठी 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च

Latest news Chara sathavnuk Livestock Farmers Scramble to Stockpile Fodder | चारा साठविण्यासाठी लगबग, एक टन मक्याची कुट्टी भरण्यासाठी 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च

चारा साठविण्यासाठी लगबग, एक टन मक्याची कुट्टी भरण्यासाठी 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च

Chara Sathavnuk : जनावरांचा चारा साठविण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

Chara Sathavnuk : जनावरांचा चारा साठविण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निहाळे फत्तेपूर येथील शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनाकडे वळले असून विक्रमी दूध संकलन करीत आहेत. त्यामुळे वर्षभरासाठी जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून जनावरांचा चारा साठविण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

त्यामुळे मिळेल तेथून खरेदी करून त्याचे रूपांतर मुरघासात करून ठेवण्याला प्राधान्य दिले तालुक्यातील जात आहे. सिन्नर पूर्व भागातील निहाळे फत्तेपूर परिसरात मुरघासासाठी लागणाऱ्या हिरव्या मक्याच्या पिकाला मागणी वाढली आहे. त्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना अगदी तीन ते चार महिन्यांत चांगले उत्पन्न मिळते. मुरघास हा सात ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटल मिळतो. 

शेतकऱ्यांकडील हिरवी मका दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल घेऊन कुट्टी केली जाते. पॅकिंगसाठी लागणाऱ्या बॅगीचा खर्च ६०० रु. असून मक्याचा चारा कुट्टी मशिनद्वारे करून भरून देण्याचा खर्च १००० रुपये येतो. एक टन मक्याची कुट्टी भरण्यासाठी पशुपालकांना ३ ते ४ हजार रुपये टनांपर्यंत खर्च येतो.

वाळलेल्या चाऱ्याच्या तुलनेत मुरघासची पौष्टिकता उत्तम असते. जास्तीत जास्त अन्नद्रव्ये चाऱ्यामध्ये येतात. मुरघासमुळे जनावरांच्या पचनक्रियेत वाढ होऊन दुग्धोत्पादन वाढते.
- छबू सांगळे, दूध उत्पादक, निहाळे

Web Title : चारा भंडारण की होड़: एक टन पर ₹3-4 हजार का खर्च

Web Summary : सिन्नर के किसान दूध उत्पादन के लिए चारा जमा कर रहे हैं। हरे मक्का की मांग अधिक है, जिससे किसानों को लाभ हो रहा है। मक्का को साइलेज में संसाधित करने में ₹3-4 हजार प्रति टन का खर्च आता है, लेकिन यह पाचन और दूध उत्पादन में सुधार करता है।

Web Title : Rush to Stock Fodder: ₹3-4 Thousand Cost Per Ton

Web Summary : Sinnar farmers are actively storing fodder for their livestock, crucial for milk production. Demand for green maize for silage is high, benefiting maize farmers. Processing maize into silage costs ₹3-4 thousand per ton, but improves digestion and milk yield.