Lokmat Agro >शेतशिवार > Chana Variety : 104 दिवसांत येणारे, सर्वाधिक उत्पादन देणारे हरभऱ्याचे नवे वाण आले!

Chana Variety : 104 दिवसांत येणारे, सर्वाधिक उत्पादन देणारे हरभऱ्याचे नवे वाण आले!

Latest News Chana Variety Successful development of new variety of gram 'Kabuli-5 by akola university | Chana Variety : 104 दिवसांत येणारे, सर्वाधिक उत्पादन देणारे हरभऱ्याचे नवे वाण आले!

Chana Variety : 104 दिवसांत येणारे, सर्वाधिक उत्पादन देणारे हरभऱ्याचे नवे वाण आले!

Chana Variety : हरभऱ्याच्या 'काबुली-५' (एकेजीके-१८०१) या नव्या वाणाची यशस्वी निर्मिती केली आहे.

Chana Variety : हरभऱ्याच्या 'काबुली-५' (एकेजीके-१८०१) या नव्या वाणाची यशस्वी निर्मिती केली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

- राजरत्न शिरसाठ 

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (PDKV) यांनी हरभऱ्याच्या 'काबुली-५' (एकेजीके-१८०१) या नव्या वाणाची यशस्वी निर्मिती केली आहे.

यांत्रिक कापणीसाठी (Chana Variety) उपयुक्त असलेल्या या वाणामुळे शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसोबतच शेती यांत्रिकीकरणासाठीही मदत होणार आहे. या वाणाचे दाणे टपोरे असून १०० दाण्यांचे सरासरी वजन ४५ ग्रॅम आहे.

हरभरा हे एक महत्त्वाचे कडधान्य पीक (Chana Farming)आहे, आणि त्याच्या नव्या वाणांची निर्मिती करण्यासाठी विविध कृषी संशोधन केंद्रे आणि विद्यापीठे सातत्याने काम करत आहेत. या नव्या वाणांमध्ये उच्च उत्पादन क्षमता, रोगप्रतिकार क्षमता आणि इतर सुधारित गुणधर्म असतात. 

१०४ दिवसात परिपक्व होते पीक
हे पीक केवळ १०४ दिवसांत परिपक्व होते. याचे सरासरी उत्पादन हेक्टरी २०६७ किलो इतके आहे. हे उत्पादन पीकेव्ही काबुली-४ पेक्षा ४२.८४ टक्के, काबुली-२ पेक्षा २८.४६ टक्के आणि 'कृपा' वाणापेक्षा ८.१६ टक्क्यांनी अधिक आहे. त्याला मर रोगाचा चांगला प्रतिकारही आहे.

काबुली-५ हा वाण राज्यात यांत्रिक कापणीसाठी विकसित केलेला पहिलाच वाण असून, तो उत्पादनक्षम व रोगप्रतिरोधक आहे.
- डॉ. अर्चना थोरात, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Web Title: Latest News Chana Variety Successful development of new variety of gram 'Kabuli-5 by akola university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.