Chana Procurement : अकोला जिल्ह्यात हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, शासनाने जाहीर केलेल्या हमीदरानुसार नवीन हरभऱ्याची खरेदी १ मार्चपासून सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.(Chana Procurement)
यानुसार नोंदणीसह हमीदराने हरभरा खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे जिल्हा पणन अधिकारी अतुल तळोकार यांनी दिली.
हमीभावामुळे शेतकऱ्यांना आधार
यंदा नवीन हरभऱ्यासाठी शासनाने ५ हजार ८७५ रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव निश्चित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक वाढू लागली होती.
मात्र, खुल्या बाजारात शेतकऱ्यांना ५ हजार २०० ते ५ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल
असा दर मिळत होता. हा दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते.
शेतकऱ्यांची मागणी पूर्ण
कमी बाजारभावामुळे हरभरा हमीदराने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत १ मार्चपासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता दिली.
नोंदणीसह खरेदी प्रक्रिया सुरू
शासकीय दराने हरभऱ्याची खरेदी
बाजारभावातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न
रब्बी हंगामातील आवक वाढली
यंदाच्या रब्बी हंगामातील नवीन हरभऱ्याची आवक मागील १५ दिवसांपासून बाजारात सुरू झाली आहे. उत्पादन चांगले झाल्याने बाजारात पुरवठा वाढला आणि दर घसरले होते. यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव निर्माण झाला होता.
आता मिळणार हमीभाव
हमीदराने खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार
खुल्या बाजारातील तोटा टळणार
उत्पन्नात स्थैर्य येणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
१ मार्चपासून सुरू होणारी हमीदर खरेदी प्रक्रिया हरभरा उत्पादकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. बाजारभाव कमी असतानाही शासनाच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक वाचा :Harbhara Kharedi : बाजारात कमी दर, खरेदी केंद्र बंद; हरभरा विकायचा कुठे?
