नाशिक : मधमाशीपालन व्यवसायाला गती मिळावी तसेच मधपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने २०२६ साठी मधुमित्र व मुधसखी पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
इच्छुकांनी आपले अर्ज ४ मे २०२६ पुवी जिल्हा कार्यालयात पाठवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई चे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील यांनी केले असल्याची माहिती नाशिकच्या प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, वैशाली भामरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
महामंडळाच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून मधुमित्र व मुधसखी पुरस्कार योजना सुरू झाली आहे. मधमाशी पालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपाळांना प्रथम पुरस्कार रूपये ११ हजार, द्वितीय पुरस्कार रूपये ७ हजार व तृतीय पुरस्कार रूपये ५ हजार ने सन्मानित करण्यात येते. यातील एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव आहे.
२० मे २०२६ रोजी जागतिक मधमाशी दिनी पुणे जिल्ह्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पुरस्काराची लिंक मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच प्रत्येक जिल्हा व ग्रामोद्योग मंडळाचया कार्यालयात पुरस्कारासाठीचे अर्ज उपलब्ध आहेत.
इथे करा संपर्क अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय, नाशिक संपर्क 0253-2352737 / 8329565489 यावर किंवा संचालक , मध संचालनालय, महाबळेश्वर 02168-260264 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.
Web Summary : Maharashtra Khadi Board invites applications for Madhumitra and Madhusakhi awards to encourage beekeeping. Winners receive cash prizes. Apply by May 4, 2026. Distribution on World Bee Day, May 20, 2026. Contact district offices for details.
Web Summary : महाराष्ट्र खादी बोर्ड मधुमक्खी पालन को प्रोत्साहित करने के लिए मधुमित्र और मधुसखी पुरस्कारों के लिए आवेदन आमंत्रित करता है। विजेताओं को नकद पुरस्कार मिलेंगे। 4 मई, 2026 तक आवेदन करें। वितरण विश्व मधुमक्खी दिवस, 20 मई, 2026 को। विवरण के लिए जिला कार्यालयों से संपर्क करें।