रूपेश उत्तरवार
BT Cotton Seeds : राज्यभरात बोगस बीटी (Fraud) बियाण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. यावर्षी बोगस बीटी बियाणे ३० टक्क्यांपेक्षा जास्त विकले गेल्याचा धोका व्यक्त केला जात आहे. 'बीजी फाइव्ह' (BG Five) बियाणे असल्याची थाप एजंटांकडून दिली जात आहे. (BT Cotton Seeds)
या बियाणाच्या खरेदीसाठी शेतकरी चढाओढ करीत आहेत. अधिक उत्पादनाच्या आशेने शेतकरी अशा बोगस बियाणांच्या खरेदीसाठी चढाओढ करीत असून, एका बॅगसाठी तब्बल १ हजार ५०० रुपये मोजले जात आहेत.(BT Cotton Seeds)
राज्यभरात बोगस बीटी बियाणाची बिनधास्त विक्री सुरू असून, याचे बिंग फुटू नये म्हणून बियाणे लेबलविना, खुल्या पॉकेटमध्ये विकले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (BT Cotton Seeds)
विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना कोणतेही अधिकृत बिल न देता थेट सरकीच (कापसातील बी) शेतकऱ्यांना दिली जाण्याची शक्यताही आहे. यामुळे हे झाड उगवले तरी पहाटीला बोंड आणि पात्या लागणार नाही, असा धोका आहे.(BT Cotton Seeds)
३०% बियाणे परत करण्याची वेळ
दरवर्षी पेरणीपूर्वी मोठ्या प्रमाणात बियाणाची उचल होते. यावर्षी गावपातळीवरील व्यावसायिकांकडून बियाण्याची उचल होत नसल्याची बाब पुढे आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्के कपाशी बियाणाची उचल कमी झाल्याचीच बाब पुढे आली आहे. यामुळे मोठे व्यापारी चिंतेत सापडले आहेत.
तणनाशक आणि अळ्यांना रोखण्याचा अजब दावा
* ही बॅग दीड हजारापर्यंत ग्राहकाला विकली जात आहे. बीजी फाइव्ह या नावाखाली हे बियाणे माथी मारले जात आहे.
* विविध प्रकारच्या किडीवर यातून मात होणार आहे. तणनाशक फवारता येणार असल्याचे एजंट सांगत आहेत. याच बेसवर बियाणाची खरेदी होत आहे.
बीजी फाइव्ह अशी कुठलीही व्हरायटी विकसित झाली नाही. असे बियाणे विक्रीला आणण्याची परवानगी अद्यापही नाही. मुळात बोगस बियाणे या पद्धतीने विकले जात आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे. यामुळे बियाणे न उगविल्यास, इतर प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई करता येते. अशा विक्रेत्यांविरोधात तक्रारी द्या, आम्ही कारवाई करू. - संतोष डाबरे, कृषी अधीक्षक, यवतमाळ
हे ही वाचा सविस्तर : HTBT Cotton Seeds : एचटीबीटीवरून संघर्ष उफाळतोय; ठोस निर्णयाची गरज वाचा सविस्तर