Lokmat Agro >शेतशिवार > Bogus Fertilizer : शेतकऱ्यांची फसवणूक टळली! 'या' जिल्ह्यातील बोगस खत साठेबाजीवर कृषी विभागाची कारवाई

Bogus Fertilizer : शेतकऱ्यांची फसवणूक टळली! 'या' जिल्ह्यातील बोगस खत साठेबाजीवर कृषी विभागाची कारवाई

latest news Bogus Fertilizer: Farmers' fraud averted! Agriculture Department takes action against bogus fertilizer hoarding in 'Ya' district | Bogus Fertilizer : शेतकऱ्यांची फसवणूक टळली! 'या' जिल्ह्यातील बोगस खत साठेबाजीवर कृषी विभागाची कारवाई

Bogus Fertilizer : शेतकऱ्यांची फसवणूक टळली! 'या' जिल्ह्यातील बोगस खत साठेबाजीवर कृषी विभागाची कारवाई

Bogus Fertilizer : खरीप हंगामाची धावपळ सुरू असतानाच खत विक्रेत्यांची मनमानी वाढतेय. जालना जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल १३० खत विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या, तर दोन ठिकाणी २२ लाखांहून अधिक किंमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला.(Bogus Fertilizer)

Bogus Fertilizer : खरीप हंगामाची धावपळ सुरू असतानाच खत विक्रेत्यांची मनमानी वाढतेय. जालना जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल १३० खत विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या, तर दोन ठिकाणी २२ लाखांहून अधिक किंमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला.(Bogus Fertilizer)

शेअर :

Join us
Join usNext

Bogus Fertilizer : खरीप हंगामाची धावपळ सुरू असतानाच खत विक्रेत्यांची मनमानी वाढतेय. जालना जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल १३० खत विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या, तर दोन ठिकाणी २२ लाखांहून अधिक किंमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला.(Bogus Fertilizer)

डीएपी खताचा तुटवडा असतानाच, काही विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.खरीप हंगाम सुरू होतानाच जिल्ह्यातील अनेक खत विक्रेत्यांनी नियमांची पायमल्ली करत शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.(Bogus Fertilizer)

मात्र, जिल्हा परिषद कृषी विभागाने याविरोधात मोहीम छेडत धडक कारवाई केली असून, तब्बल १३० विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच, दोन ठिकाणी एकूण २२.७० लाख रुपये किमतीचा अनधिकृत खत साठा जप्त करण्यात आला आहे.(Bogus Fertilizer)

खताच्या मागणीविरुद्ध कमी पूर्तता; डीएपीचा तुटवडा तीव्र

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात २.७७ लाख मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली होती. याच्या तुलनेत शासनाकडून २.२४ लाख मेट्रिक टन खताची मंजुरी मिळाली.

जिल्ह्यात आधीपासून ८६ हजार ९६१ मेट्रिक टन जुना साठा आणि ८७ हजार २० मेट्रिक टन नव्याने पूर्तता मिळून सुमारे १.७३ लाख मेट्रिक टन खत उपलब्ध होते. यापैकी १.१० लाख मेट्रिक टन खत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले.

तथापि, डीएपी खताची कमतरता अजूनही भासत असून, ग्रामीण भागात शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याउलट युरिया व इतर खतांचा साठा भरपूर आहे.

अनधिकृत खतविक्रीवर धाड; मोठा साठा जप्त

कृषी विभागाच्या कारवाईत चंदनझिरा परिसरातून २.७० लाख रुपयांचा १० मेट्रिक टन डीएपी साठा जप्त करण्यात आला आहे, तर माहोरा परिसरातून तब्बल २० लाख रुपयांचा ३२० मेट्रिक टन खताचा अनधिकृत साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई खते नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आहे.

१८०० परवानेधारकांपैकी १०८५ विक्रेते सक्रीय

सध्या जिल्ह्यात सुमारे १ हजार ८०० खत विक्री परवानेधारक असून त्यापैकी १०८५ विक्रेत्यांनी खते विक्री सुरू केली आहे. खत विक्रीसाठी इ-पॉस मशीन वापराची सक्ती करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कसोशीने कारवाई सुरू आहे.

१३० विक्रेत्यांना नोटिसा; खुलासा न दिल्यास कठोर कारवाई

तपासणी मोहिमेदरम्यान १३० खत विक्रेत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून खुलासे मागविण्यात आले आहेत. विभागीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, खुलासे असमाधानकारक ठरल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही सातत्याने दुकानांची तपासणी करत आहोत. दोषींवर नियमानुसार कडक कारवाई केली जाईल.- पी. बी. बनसवडे, कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना

खरीप हंगामात काय घडते आहे?

खते उपलब्ध – एकूण १.७३ लाख मेट्रिक टन साठा

डीएपीचा तुटवडा – ग्रामीण भागात वाढती गरज

१८०० परवाने – १०८५ विक्रेते सक्रीय

१३० नोटिसा – अनियमितता आढळल्यामुळे

२ ठिकाणी मोठा साठा जप्त – २२.७० लाख रुपयांचा साठा

जालना जिल्हा तालुकानिहाय खरिप पेरणी

तालुकापेरणी (%)
घनसावंगी४६.२९%
जालना५८.१०%
बदनापूर५१.०८%
अंबड६९.३९%
मंठा९१.६१%
परतूर७५.११%

हे ही वाचा सविस्तर :धाड नाही, तपासणी नाही! कृषी केंद्रांवर आता कोण करणार कारवाई? वाचा सविस्तर

Web Title: latest news Bogus Fertilizer: Farmers' fraud averted! Agriculture Department takes action against bogus fertilizer hoarding in 'Ya' district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.