Join us

MahaDBT Portal : महाडीबीटी पोर्टलमध्ये आता नवे अपडेट, 'या' शेतकऱ्यांना होईल फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 17:09 IST

MahaDBT Portal : एकूणच शासकीय योजनांची अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळेपर्यंतची प्रक्रिया या पोर्टलद्वारे केली जाते

MahaDBT Portal : शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देणारे, शासनाचे महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) काही दिवसांपासून बंद आहे. पोर्टलमध्ये काही तांत्रिक सुधारणा किंवा अपडेट करण्यासाठी ते बंद ठेवण्यात आले आहे. अशातच या पोर्टलबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

महाडीबीटी पोर्टलच्या (Mahadbt Portal) माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळते. शेतकरी यावर अर्ज प्रक्रिया करतात. एकूणच शासकीय योजनांची अर्ज करण्यापासून ते अनुदान मिळेपर्यंतची प्रक्रिया या पोर्टलद्वारे केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची हे अतिशय महत्वाचे पोर्टल मानले जाते. हे पोर्टल सध्या तांत्रिक सुधारणेसाठी बंद ठेवण्यात आले आहे. 

दरम्यान महाडीबीटी पोर्टलकडून याबाबत अपडेट देण्यात आली आहे. ती अशी की, महा-डीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी हे नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील.

सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी "प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य" हि कार्यपद्धती अवलंबवण्यात येत आहे. आपण यापूर्वी केलेले अर्ज या साठी ग्राह्य धरण्यात येतील. आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक हा आपण पोर्टल वर "शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी" या लिंक वर क्लिक करून आपण बघू शकता.

"प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य" हि कार्यपद्धती अवलंबवण्यात येत असल्यामुळे एखाद्या घटकासाठी जे शेतकरी लवकर अर्ज करतील, त्यांना प्रथम लाभ मिळणार आहे. लवकरच बियाणे घटकासाठी अर्ज सुरू होतील, असेही या अपडेटद्वारे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :कृषी योजनाशेतीशेतकरीमहाराष्ट्र