Lokmat Agro >शेतशिवार > कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक यांची नावे बदलण्यास मान्यता, वाचा मंत्रिमंडळ निर्णय 

कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक यांची नावे बदलण्यास मान्यता, वाचा मंत्रिमंडळ निर्णय 

Latest News Approval to change names of Agricultural Assistant, Agricultural Supervisor, read the cabinet decision | कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक यांची नावे बदलण्यास मान्यता, वाचा मंत्रिमंडळ निर्णय 

कृषी सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक यांची नावे बदलण्यास मान्यता, वाचा मंत्रिमंडळ निर्णय 

Agriculture News : मंत्री मंडळाच्या बैठकीत कृषी सहाय्यक (Krushi Sahayyak) आणि कृषी पर्यवेक्षकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

Agriculture News : मंत्री मंडळाच्या बैठकीत कृषी सहाय्यक (Krushi Sahayyak) आणि कृषी पर्यवेक्षकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News :  एकीकडे खरीप हंगामाच्या (Kharif Season) तोंडावर राज्यातील कृषी सहाय्यकांचे आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे मंत्री मंडळाच्या १४ व्या बैठकीत कृषी सहाय्यक (Krushi Sahayyak) आणि कृषी पर्यवेक्षकांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Mantri Mandal) कृषि पर्यवेक्षक व कृषि सहायक यांच्या पदनामात 'उप कृषि अधिकारी' व 'सहायक कृषि अधिकारी' असा बदल करण्यास मान्यता देण्यात आली. 

दरम्यान कृषी सहाय्यक (Agricultural Assistant) आणि सहाय्यक कृषी अधिकारी (Assistant Agricultural Officer) ही दोन वेगळी पदे आहेत. कृषी सहाय्यक हे गाव पातळीवर काम करतात, तर सहाय्यक कृषी अधिकारी हे तालुका किंवा विभाग स्तरावर काम करतात. मात्र आता कृषी सहाय्यक हे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून ओळखले जातील. 

तसेच कृषी पर्यवेक्षक आणि उप कृषी अधिकारी या दोन पदांमध्ये मुख्य फरक म्हणजे त्यांची जबाबदारी आणि अधिकार. कृषी पर्यवेक्षक हे क्षेत्रात काम करतात, तर उप कृषी अधिकारी हे कार्यालयीन काम आणि योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात. तर आजच्या निर्णयानुसार आता कृषी पर्यवेक्षक हे उप कृषी अधिकारी म्हणून ओळखले जातील. 

Web Title: Latest News Approval to change names of Agricultural Assistant, Agricultural Supervisor, read the cabinet decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.