Lokmat Agro >शेतशिवार > पिकाला पाणी किती द्यायचं? कधी बंद करायचं? शेतकऱ्यांनी ड्रीप ऑटोमेशनला दिली एआयची जोड

पिकाला पाणी किती द्यायचं? कधी बंद करायचं? शेतकऱ्यांनी ड्रीप ऑटोमेशनला दिली एआयची जोड

Latest News AI In agriculture Farmers add AI to drip automation in nashik district | पिकाला पाणी किती द्यायचं? कधी बंद करायचं? शेतकऱ्यांनी ड्रीप ऑटोमेशनला दिली एआयची जोड

पिकाला पाणी किती द्यायचं? कधी बंद करायचं? शेतकऱ्यांनी ड्रीप ऑटोमेशनला दिली एआयची जोड

Ai In Agriculture : ठिबक सिंचनातील 'ड्रीप ऑटोमेशन' (Drip Automation) तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. त्यातून मजूर खर्च, वेळ आणि श्रम यात मोठी बचत होत आहे.

Ai In Agriculture : ठिबक सिंचनातील 'ड्रीप ऑटोमेशन' (Drip Automation) तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. त्यातून मजूर खर्च, वेळ आणि श्रम यात मोठी बचत होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : हवामानाचे चक्र बिघडले आहे, जमिनीचा पोत बदलतोय, किडींची वाढलेली प्रतिकारशक्ती व नव्या प्रजातीचा थेट परिणाम शेतीवर होत आहे. त्यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील २० टक्के शेतीमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) चा वापर वाढल्याचे कृषी अधिकाऱ्यांसह तज्ज्ञांनी सांगितले. 

ठिबक सिंचनातील 'ड्रीप ऑटोमेशन' (Drip Automation) तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. त्यातून मजूर खर्च, वेळ आणि श्रम यात मोठी बचत होत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले वेदर सिस्टीमही या ऑटोमेशनला बहुतांश ठिकाणी जोडले गेले असून काम अजून सोपे व्हावे यासाठी एआयची जोड 'ड्रीप ऑटोमेशनला देण्यात येत आहे. यामुळे एकरी उत्पादनात वाढ होत आहे.

राज्य सरकारने सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात शेतीक्षेत्रातील एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी दोन वर्षाकरिता ५०० कोटी रुपयांची तरतूद केली. विहिरीपासून ३०० ते ५०० फूट अंतरावर स्वतंत्र शेडमध्ये स्वयंचलित ठिबक यंत्रणेचे युनिट बसविले जात असून ऑटोमेशन' तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष शेतीशी जोडले जात आहे.

जिल्ह्यात सध्या फक्त २० टक्के वापर या तंत्रज्ञानाचा होत असून त्यात वाढ होण्याासाठी प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक अभिमन्यू काशीद यांनी सांगितले.

कृषी ॲपच्या माध्यमातून ५० हजार खर्चात आधुनिक शेती
सिन्नर तालुक्यातील मोहू येथील सुनील भिसे (वय ४३) हे एमएस्सी ॲग्रीकल्चर असून त्यांची आठ एकर शेती आहे. त्यात ते मिरची, पेरू, सोयाबीनचे पीक घेतात. त्यांनी स्वयंचलित पद्धतीचे ऑटोमेशन तंत्रज्ञान व वेदर सिस्टीम स्वतःच्या शेतीत बसविले आहे. यासाठी फायलो ॲपचा वापर ते करतात. 

शेतात पाणी देण्यासाठी ऑटो मोबालइद्वारे ऑटो सिस्टीम त्यांनी कार्यान्वित केली आहे. यासाठी त्यांना अवघा ५० हजार रुपये इतका खर्च आला. पाणी किती द्यायचे, प्रवाह कधी बंद करायचा हे ऑटो सिस्टीमने विकसित केले आहे. जमिनीला ओलावा, कीडरोग वैगेरे माहिती त्यांना स्वयंचलित वेदर सिस्टीमच्या माध्यमातून मिळते.

एआय कसे काम करते? 
एआयच्या माध्यमातून वेदर स्टेशनच्या सेन्सरद्वारे आणि सॅटेलाइट मॅपआधारे शेतीतील पिकांचे मॉनिटरिंग केले जाते. शेतीमधील माती, जमिनीची, खतांची माहिती, वातावरण बदलाची माहिती आणि पिकाला नेमकी गरज काय आहे, याची नेमकी माहिती त्यातून मिळते. वेदर स्टेशनमध्ये १२ प्रकारचे पॅरामीटर्स आहेत. 

त्यात झाडाच्या मुळाजवळ सात इंचावर प्रायमरी सॉइल मॉइश्चर आणि सेकंड सॉइल मॉइश्चर असे दोन सेन्सर बसविले आहेत, ते हे सर्व कार्य करतात. त्यातूनच मग जमिनीचा ओलावा, तापमान आणि बदल याची माहिती मिळते. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे या संपूर्ण पिकाचे सॅटेलाइटद्वारे मॉनिटरिंग केले जाते आणि त्याबाबतचे अलर्टही सातत्याने शेतकऱ्यांना त्यांच्याकडील अॅपवर मिळतात.

MahaDBT Farmer Lottery : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा!

Web Title: Latest News AI In agriculture Farmers add AI to drip automation in nashik district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.