Pune : राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतातील उभे पिक, माती वाहून गेली असून जनावरांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूमुखी पडलेले एकूण पशुधनाची संख्या ही पावणेदोन लाखांच्या जवळ आहे.
पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात अतिवृष्टीमुळे मोठी जनावरे (जसे की, गाय, म्हैस, बैल), लहान पशुधन (शेळी, मेंढी, वराह) आणि कोंबड्यांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला आहे. गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या मिळून जवळपास १ लाख ७३ हजार ७६१ जनावरे मृत्युमुखी पडले आहेत.
एनडीआरएफ च्या निकषानुसार मदत अतिवृष्टीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांसाठी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एनडीआरएफ च्या निकषानुसार देण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली असून अनेक शेतकऱ्यांना भरपाईचे पैसे जमा झाले आहेत.
मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची आकडेवारी
मोठी जनावरे - गायी, म्हशी, बैल, घोडेमृत्युमुखी संख्या - ४ हजार ८१७
लहान जनावरे - शेळ्या, मेंढ्या, वराहमृत्युमुखी संख्या - ३ हजार ८७०
कोंबड्यामृत्युमुखी संख्या - १ लाख ६५ हजार ७४
लंपीचा प्रादुर्भाव आणि काळजी मागच्या काही दिवसांमध्ये जनावरांमध्ये लंपी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत होता. असे आढळून आल्यास आपल्या जनावरांना लवकरात लवकर शासकीय पशू वैद्यकांना दाखवावे. यासोबतच लंपी झालेल्या जनावरांना बाजूला ठेवावे. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
Web Summary : Heavy rains in Maharashtra during September caused immense agricultural damage and livestock deaths. Nearly 175,000 animals, including cattle, goats, sheep, and poultry, perished. Compensation is being provided to farmers based on NDRF norms. Lumpy skin disease precautions are also advised for livestock.
Web Summary : सितंबर में महाराष्ट्र में भारी बारिश से कृषि को भारी नुकसान हुआ और पशुधन की मौतें हुईं। मवेशी, बकरी, भेड़ और मुर्गी सहित लगभग 1.75 लाख जानवर मारे गए। एनडीआरएफ मानदंडों के आधार पर किसानों को मुआवजा दिया जा रहा है। पशुधन के लिए लम्पी त्वचा रोग की सावधानियों की भी सलाह दी जाती है।