Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : केसर आंबा लागवडीसाठी 'ही' पद्धत ठरेल बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : केसर आंबा लागवडीसाठी 'ही' पद्धत ठरेल बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Agriculture News Ultra dense planting method is best option for saffron mango cultivation, know in detail | Agriculture News : केसर आंबा लागवडीसाठी 'ही' पद्धत ठरेल बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : केसर आंबा लागवडीसाठी 'ही' पद्धत ठरेल बेस्ट पर्याय, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : शेतकऱ्यांना आंबा अति घन लागवडीतुन निर्यात योग्य उत्पादन कसे घेता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Agriculture News : शेतकऱ्यांना आंबा अति घन लागवडीतुन निर्यात योग्य उत्पादन कसे घेता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

शेअर :

Join us
Join usNext

Agriculture News : ऍग्रो इंडिया गट शेती संघाचा 242 वा गट शेती शेतकरी सुसंवाद मेळावा पार पडला. आधुनिक पद्धतीने उभारलेल्या अति घन लागवड आंबा बागेत शिवार फेरी करून संपन्न झाला. यावेळी महा केसर आंबा बागायतदार (Kesar Mango) संघाचे उपाध्यक्ष तथा गट शेती प्रणेते डॉ भगवानराव कापसे यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून सादरीकरण केले. गट शेतीतील शेतकऱ्यांना आंबा अति घन लागवडीतुन निर्यात योग्य उत्पादन कसे घेता येईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी अति घन लागवड तंत्रज्ञान 2005 साली दक्षिण आफ्रिका येथे पाच हजार एकरवर आंबा बाग (Mango Farming) पाहिली. त्या बागेची संपूर्ण माहिती घेऊन 2006 साली धाराशिव जिल्ह्यातील रुईभर येथे सुरुवातीची अति घन लागवड म्हणजे दोन बाय चार मीटरची लागवड केली. त्यानंतर 2007 साली नाथ सीड कंपनीच्या ढाकेफळ येथील फार्मवर बारा एकरवर अतिउच्च तंत्रज्ञानाने दोन बाय चार एकरवर लागवड केली. 

हळूहळू अशा प्रकारची लागवड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता वाढत गेली आहे. अशा लागवडीतूनच (Mango Cultivation Method) कमी मजुरांमध्ये तिसऱ्याच वर्षी आणि अगदी एप्रिलच्या सुरुवातीलाच माल काढायला येणे, या गोष्टी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो. त्यामध्ये आंब्यासाठी जमीन कशी असावी, पाण्याची हमी असावी, त्याचबरोबर कलमाबरोबर त्याच्या बाजूला लागवड करतानाच ताज्या कोयी लावून त्या वाढल्यानंतर कलमाच्या खोडास जोडून हायब्रीड मोडद्वारे लागवड केल्यास सोटमूळ पार खोल जाते. 

निर्यातीस चालना 
त्यामुळे बागेतील झाडे पाण्याचा ताण, हवेच्या झोतापासून स्वतःचा बचाव करू शकतात. अशा बागेतील झाडे छाटणी केल्यामुळे लहान राहतात आणि त्यामुळे विरळणी सोपी होते, काढणी सोपी होते. त्याचबरोबर एप्रिलच्या सुरुवातीस माल काढणीस येत असल्यामुळे इंग्लंड, अमेरिका, जपान अशा अति उच्चतंत्र व खवय्याचे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागला आहे. त्यासाठीचे सुद्धा वेफर हिट ट्रीटमेंट, जपानसाठी तर क्ष किरण ट्रीटमेंट अमेरिकेसाठी याच्या चाचण्या 96 ते 2000 या दरम्यान घेतल्या. 

एका महिन्यात इतके उत्पन्न 
त्याचबरोबर या भागातील शेतकरी जर गट पद्धतीने अति घन आंबा लागवड तयार असतील. तर सावित्रीबाई फुले एनजीओ बरोबर या भागातील शेतकऱ्यांना पुढील तंत्रज्ञान देण्यास तयार आहोत, असे सांगितले. याचबरोबर त्यांनी सांगितले इतर इच्छुक शेतकऱ्यांनी अशा उच्च तंत्रज्ञानाने एक एकर लागवड केली तर त्या महिना 35 हजार रुपये कमीत कमी मिळू शकतो हे सविस्तर पटवून दिले.

तसेच यावेळी मोहर, मोहोरातील नर व संयुक्त फुलांची ओळख , भुरी रोगाची तसेच मोहरावर येणाऱ्या विविध किडींची सविस्तर माहिती देऊन या मोहराचे संरक्षण कसे करता येईल, त्याचबरोबर फळाची साईज वाढवणे, फळाची क्वालिटी निर्यात योग्य बनवणे याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. 

Web Title: Latest News Agriculture News Ultra dense planting method is best option for saffron mango cultivation, know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.