Join us

Tarbuj Lagvad :  'मल्चिंग पेपर'वर टरबुजाची लागवड वाढली, कांदा पिकाला पर्याय ठरेल का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 20:45 IST

Tarbuj Lagvad : येवला तालुक्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर उशिरा उन्हाळ कांदा लागवडीच्या (Kanda Lagvad) क्षेत्रात वाढ झाली आहे.

नाशिक : सर्वत्र झालेल्या दमदार पावसामुळे तसेच कांदा रोपांची सड झाल्यामुळे पर्यायाने शेतकरी फळ पिकाकडे (Fruit Crops) वळला आहे. येवला तालुक्यात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर उशिरा उन्हाळ कांदा लागवडीच्या (Kanda Lagvad) क्षेत्रात वाढ झाली आहे. कांदा लागवडीकडे असलेला कल बघता तालुक्यातील अनेक भागातील बहुतांश शेतकरी यंदा टरबूज पिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे.

येवला तालुक्यात जवळपास अंदाजे २०० एकरावर टरबुजाची लागवड (watermelon Cultivation) झाली असून अनेक शेतकऱ्यांचे टरबूज विक्रीसाठी उपलब्ध झाले असून मागणी ही चांगल्या प्रमाणात आहे. टरबूज लागवडीसाठी पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांनी 'मल्चिंग पेपर'चा वापर करून सुधारित पद्धतीचा स्वीकार केल्यामुळे यंदा टरबुजाचे चांगल्यापैकी उत्पन्न निघण्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे.

कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाल्याने भाजीपाला पिकांकडील कल कमी झालेला पाहता जळगाव नेऊर परिसरासह धुळगाव, देशमाने, पाटोदा, पालखेड डावा कालवा क्षेत्राखालील तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी टरबूज व मिरचीची लागवड केली.

रोपे बुकिंगला प्राधान्यशेतकऱ्यांनी नर्सरीमध्ये टरबुजाची रोपे बुक करून मल्चिंग पेपरवर टरबूज लागवड केली आहे. ७० ते ७५ दिवसात टरबूज काढणीला येते. एक एकर क्षेत्रासाठी सहा ते सात हजार टरबूज रोपांची आवश्यकता असते. काही भागात टरबूज लागवड झाली आहे तर, काही ठिकाणी भाजीपाला पिकाची रेलचेल सुरू आहे.

एक एकरावर मल्चिंग पेपर वापरून टरबुजाची लागवड केलेली आहे. दोन रुपये ७० पैसे प्रमाणे प्रति रोप बुक करून साधारणपणे आज ७० ते ७५ दिवस झाले आहे. टरबुजाला नऊ ते दहा रुपये किलो प्रमाणे बाजारभाव मिळत आहे.- शरद गायकवाड, शेतकरी धुळगाव

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीनाशिकलागवड, मशागतपेरणीकांदा