Agriculture News : पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दि. २३ ते २७ ऑगस्ट २०२५ दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८-३० डिग्री सें. व किमान तापमान २२-२३ डिग्री सें. दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग १५-२२ कि.मी/तास या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
- पेरणी केलेल्या पिकावर किडी रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास स्थानिक तज्ञाच्या सल्लानुसार पिकनिहाय उपाययोजना करावी.
- जून मध्ये पेरणी केलेल्या भुईमुग पिकात वापसा आल्यास हात कोळप्याने खुरपणी करावी.
- मुग व उडिद- फुलकळी लागण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत गरजेनुसार शिफारशीत कीड व रोग नियंत्रणाचे उपाय करावेत.
- यासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एस. एल. ६२५ मि.ली. + पाण्यात मिसळणारे गंधक १२५० ग्रॅम ५०० लिटर पाणी / हेक्टरी मिसळून फवारणी करावी.
- सध्याचा ढगाळ व दमट हवामानामुळे उभ्या खरीप पिकात विविध रोगांचे नियंत्रणासाठी ६ किलो ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५० किलो कंपोस्ट खतात मिसळून १ हेक्टर क्षेत्रावर दोन ओळीत जमिनीत मिसळावे व पाणी द्यावे.
वेल वर्गीय भाजीपाला पिके
- ढगाळ हवामानामुळे डाउनी मिल्ड्यू (केवडा) रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, अमिटोक्ट्रॅडीन (२७%) + डायमिथोमॉर्फ (२०.२७% एससी) २ मि.ली. किंवा बेनालॅक्सिल (४%) + मॅन्कोझेब (६५% डब्लूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
- भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसिलियम लेकॅमी या जैविक किटकनाशाची १ किलो प्रति २०० लिटर पाण्यातुन फवारणी करावी किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मिली प्रति १० लिटर पाण्यातुन फवारणी करावी.
- खरीप मिरची, वांगी, टोमॅटो, भेंडी, गवार, वेलवर्गीय भाजीपाला पिकांना खुरपणी करून नत्र खताचा पहिला हप्ता द्यावा.
- सतत ढगाळ वातावरण असल्यास भाजीपाला पिकांमध्ये ७ ते ८ दिवसांच्या अंतराने बुरशीनाशकाची फवारणी करावी.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी