Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture Scheme : 10 लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, काय आहे महामंडळाची 'ही' योजना? वाचा सविस्तर

Agriculture Scheme : 10 लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, काय आहे महामंडळाची 'ही' योजना? वाचा सविस्तर

Latest News Agriculture News Interest-free loans of up to Rs 10 lakh for youth for business see details | Agriculture Scheme : 10 लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, काय आहे महामंडळाची 'ही' योजना? वाचा सविस्तर

Agriculture Scheme : 10 लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज, काय आहे महामंडळाची 'ही' योजना? वाचा सविस्तर

Agriculture Scheme : युवकांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास वर्ग महामंडळामार्फत विविध योजना (Mahamandal Yojana) राबविल्या जातात.

Agriculture Scheme : युवकांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास वर्ग महामंडळामार्फत विविध योजना (Mahamandal Yojana) राबविल्या जातात.

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : इतर मागास वर्ग प्रवर्गातील होतकरू युवकांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास वर्ग महामंडळामार्फत विविध योजना (Mahamandal Yojana) राबविल्या जातात. त्यापैकी वैयक्तिक व्याज परतावा योजना ही सर्वात लोकप्रिय झाली आहे. योजनेंतर्गत सुमारे १० लाख रूपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

उद्योग, व्यवसाय स्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणून पैशाची गरज निर्माण होत असते. आर्थिक स्थिती कमजोर असलेले युवक कौशल्य असूनसुद्धा व्यवसाय करू शकत नाही. अशांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने इतर मागास विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज आहेत. गडचिरोली (Gadchiroli) येथे सामाजिक न्याय विभागात महामंडळाची कार्यालये आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गावातूनच युवक कर्जासाठी अर्ज करू शकतात.

काय आहे महामंडळाची बीजभांडवल योजना?
२० टक्के बीजभांडवल योजनेमध्ये ७५ टक्के बँक कर्ज उपलब्ध करून देते. २० टक्के रक्कम महामंडळाची असते. तर लाभार्थी हिस्सा म्हणून पाच टक्के लाभार्थ्याला भरावे लागतात. महामंडळाची २० टक्के रक्कम लाभार्थ्यांला उद्योगासाठी वापरता येते.

गटासाठी मिळते कर्ज
गावातील महिला किंवा पुरूष एकत्र येऊन उद्योग स्थापन करण्याच्या तयारीत असतील तर त्यांना महामंडळामार्फत ५० लाख रूपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. महामंडळाने जिल्ह्यातील सहा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला आहे, हे विशेष.

ऑनलाइन सुविधा
कर्जासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध आहे. कर्जासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती दिली आहे. कागदपत्रे अपलोड केल्यानंतर कर्ज उपलब्ध होते. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच महामंडळाच्या इतर योजनांचा लाभ घेता येते हे विशेष.

इतर मागास प्रवर्गातील युवकांना व्यवसाय स्थापन करण्यासाठी सवलतीत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्ज योजनेचा लाभजिल्ह्यातील युवकांनी घ्यावा. उद्योग स्थापन करून स्वावलंबी व्हावे.
- किशोर सातपुते, जिल्हा व्यवस्थापक, इतर मागास महामंडळ

Web Title: Latest News Agriculture News Interest-free loans of up to Rs 10 lakh for youth for business see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.