Lokmat Agro >शेतशिवार > शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी केल्यास विषबाधा होऊ शकते, जाणून घ्या कारण

शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी केल्यास विषबाधा होऊ शकते, जाणून घ्या कारण

latest News agriculture News Do Not spray on an empty stomach while spraying in farm Read in detail | शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी केल्यास विषबाधा होऊ शकते, जाणून घ्या कारण

शेतकऱ्यांनो उपाशीपोटी फवारणी केल्यास विषबाधा होऊ शकते, जाणून घ्या कारण

Agriculture News : राज्यात यापूर्वी अशा घटना घडल्या असून, फवारणीदरम्यान दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Agriculture News : राज्यात यापूर्वी अशा घटना घडल्या असून, फवारणीदरम्यान दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वाशिम : खरीप हंगामात (Kharif Season) तणनाशक व कीटकनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्यास विषबाधेचा धोका संभवतो. राज्यात यापूर्वी अशा घटना घडल्या असून, फवारणीदरम्यान दक्षता घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

अनेक भागात पिकांवर तणनाशक, कीटकनाशक फवारणी (Fertilizer Spray) करण्याची धामधूम सुरू झाली आहे. कीटकनाशक फवारणी करताना योग्य ती काळजी न घेतल्यास विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कीटकनाशक फवारणी करताना प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या, वाऱ्याच्या विरूद्ध दिशेने फवारणी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी

कीटकनाशकांचे मिश्रण लाकडी काडीने नीट मिसळा.
फवारणी करताना हातमोजे, बूट, मास्क, चष्मा वापरा.
औषध अंगावर उडाल्यास त्वरित धुवा.
तार/टाचणीने नोझल स्वच्छ करा.
फवारणीनंतर अंघोळ करा आणि कपडे धुवा.


फवारणी करताना काय करू नये?
उपाशीपोटी फवारणी नको.
वाऱ्याच्या विरुद्ध फवारणी टाळा.
धूम्रपान, अन्नपदार्थ वापर टाळा.
रिकामे डबे पाण्यासाठी वापरू नका.

डब्यावरील पट्टी काय दर्शवते?

  • लाल – अत्यंत विषारी,
  • पिवळी – मध्यम,
  • निळी – कमी,
  • हिरवी – सौम्य औषधे.

विषबाधा झाल्यास काय कराल?
तातडीने जवळच्या सरकारी दवाखान्यात जा. १०८ या टोलफ्री क्रमांकावर ॲम्ब्युलन्ससाठी संपर्क साधा. रुग्णाला शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत मिळवून द्या.

खरीप हंगामात कीटकनाशक फवारणी करताना खबरदारी आवश्यक आहे. योग्य तंत्र, योग्य साहित्य आणि वैयक्तिक सुरक्षेची जाणीव ठेवावी.
- आरिफ शाह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: latest News agriculture News Do Not spray on an empty stomach while spraying in farm Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.