Babhul Tree : बाभळीचे झाड (Babhul tree) माहित नसेल असा माणूस शोधून सापडणार नाही. गावाकडं गेल्यास बाभळीचे झाड हमखास दृष्टीस पडते. ते म्हणतात ना, 'घनावर घन बत्तीस घन, नाही तुटे बाबुर बन' या ग्रामीण भागातील म्हणीतून अर्थबोध असा होतो की, कितीही बाभूळ वृक्षाची तोड झाली, तरी बाभळीच्या (Gum arabic tree) वृक्षाचे प्रमाण कमी होणार नाही. मात्र हल्ली हेच बाभळीचे झाड दिसेनासे झाले आहे.
बाभूळ हे झाड वाळवंटातले असले, तरी महाराष्ट्र (Maharashtra) राज्याशिवाय मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आधी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाभळीचे झाड बघायला मिळतात. बाभळीच्या झाडाची लहान पाने, त्या झाडावर असणारे काटे शोभून दिसतात. बाभळीच्या झाडावर उन्हाळ्यात पिवळ्या फुलांचे गोलाकार पुंजके दिसून येतात.
बाभळीच्या झाडाला हिवाळ्यात शेंगा दिसतात. बाभळीच्या शेंगात खनिजे आणि जीवनसत्त्वे असे पोषक तत्त्वांनी भरले आहे. उन्हाळ्यात बाभळीच्या झाडातून द्रव्य निघत असतो. तो डिंकाच्या स्वरूपात असतो. बाभळीच्या झाडाच्या डिंकाला प्रचंड मागणी आहे. ग्रामीण भागात दात स्वच्छ करण्यासाठी बाभळीच्या शेंगाच्या दातींना म्हणून वापर करतात. बाभळीच्या खोडापासून बसायचे पाट, टेबले, खुर्चा, दरवाजे, खिडक्या केले जातात. ग्रामीण भागातील शेतकरी बाभळीच्या फांद्यावर व खोडांच्या सरपंच म्हणून वापर करतात, तसेच बाभळीच्या फांद्याचा कुंपण करायला वापर केला जातो.
शेळ्या आणि बकऱ्यांना खाण्यासाठी बाभळीच्या पाला व शेंगा उपयोगात आणला जातो. तीन दशकापूर्वी अनेक ठिकाणी बाभळीचे रान दिसायचे. पेंच प्रकल्प, बावनथडी प्रकल्प आदी ठिकाणी सिंचनाची व्यवस्था झाली. शेतात तयार करण्यात आले. बाभळीचे वन दिसत नाही. मोठ्या प्रमाणात बाभळीच्या झाडांची तोड करण्यात आली. वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्याने बाभळीचे झाडे अनेक ठिकाणी दिसेनासे झाले आहेत.
औषधीयुक्त बाभळीचे झाड
वारंवार डोकेदुखी होत असल्यास शेंगाच्या चूर्ण वापरला जातो. धातू रोग असलेल्या माणसाला बाभूळ पोड पावडर म्हणून वापरता येते. सांधेदुखी व गुडघादुखी, पाठदुखीसाठी बाभळीच्या शेंगाची पावडर वापरतात. स्नायूंना बळकट करण्यासाठी बाभळीच्या शेंगाचा पावडर दुधासोबत घेतल्यास पाठीचा त्रास कमी होतो. बाभळीच्या शेंगाचे चूर्ण युकोरियासाठी वापरला जातो. दात हालत असल्यास शेंगाचा दातना वापरतात.
शेतकऱ्याचा मित्र बाभळीचे झाड
बाभळीच्या झाडावर अनेकदा मधमाशा पोळ तयार करतात. यातूनच फळ धारणेसाठी महत्वपूर्ण भूमिका मधमाशी निभावत असते. शिवाय या सुरक्षितता म्हणून याच झाडावर निवासस्थान निवडतात व मालावर किटकांचा प्रादुर्भाव झाला की या झाडावर सर्वात जास्त सुगरण घरटे बांधणे पसंत करतात की ज्यांचे खाद्य, अळ्या आणि किटक असतात व ते वेचून खाण्याचे काम सुगरण पक्षी करतात.