Maharathwada Flood : सहाय्यक कृषि अधिकारी संघटनेतर्फे अतिवृष्टी व पुर परिस्थिती मुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी राज्यातील सर्व सहाय्यक कृषि अधिकारी यांनी मिळून एक दिवसाचे संपूर्ण वेतन स्वेच्छेने देण्याचे निर्णय घेतला आहे.
सध्या महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टीने थैमान घातले असून शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिकांचे, शेतजमिनीचे, जनावरांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट आले आहे. शासनस्तरावरून अशा आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करून दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर सहाय्यक कृषी अधिकारी संघटना देखील खारीचा वाटा उचलत आहे.
याबाबत संघटनेकडून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटलं आहे कि, सहाय्यक कृषि अधिकारी आणि शेतकरी यांचे नाते हे केवळ प्रशासकीय नसून भावनिक आहे. शेतकऱ्याच्या सुखदुःखात सहाय्यक कृषि अधिकारी नेहमीच सहभागी असतो. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करणे, पंचनामे तपार करणे, नुकसानाचे वास्तव शासनापर्यंत पोहोचवणे आणि मदत वितरणाची अंमलबजावणी करणे ही आमची प्राथमिक जबाबदारी नेहमीच तत्परतेने पार पाडत आलो आहोत.
या वेळेसही आम्ही मैदानावर उतरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे, सर्वेक्षण, डेटा संकलन आणि अहवाल सादर करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहोत, जेणेकरून शासनस्तरावर योग्य व तातडीने निर्णय घेता येतील. परंतु, कर्मचारी म्हणून केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडणे पुरेसे नाही, तर शेतकऱ्यांच्या दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होणे हीही आमची नैतिक जबाबदारी आहे.
म्हणूनच महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून कृषी विभागामध्ये कार्यरत असणारे १०००० हजार सहाय्यक कृषि अधिकारी आम्ही सप्टेंबर २०२५ महिन्याचे ऑक्टोबर २०२५ मध्ये देय असलेल्या वेतंनमधून एक दिवसाचे संपुर्ण वेतन उपरोक्त प्रभावित क्षेत्राच्या मदतीकरीता स्वेच्छेने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री मदत निधी खात्यात वर्ग करून ती थेट अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी ही, संघटनेच्या वतीने विनंती असून, मदतकार्यामध्ये आवश्यकते प्रमाणे योगदान देण्यास संघटना कटीबद्ध आहे. कर्मचारी म्हणून केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पडणे पुरेसे नाही तर शेतकरी बांधवांच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होणे हीच आमची नैतिक जबाबदारी आहे. - अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना
Web Summary : Maharashtra's agriculture officers will donate a day's salary to flood-affected farmers. The association aims to aid farmers facing severe losses due to heavy rains, providing financial relief and support during this crisis.
Web Summary : महाराष्ट्र के कृषि अधिकारी बाढ़ से प्रभावित किसानों को एक दिन का वेतन दान करेंगे। भारी बारिश के कारण गंभीर नुकसान का सामना कर रहे किसानों को सहायता प्रदान करना संघ का लक्ष्य है, जिससे इस संकट के दौरान वित्तीय राहत और समर्थन मिलेगा।