Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Agricultural Tradition : उमरी आणि भोकर परिसरात आंबील बारस उत्साहात; जाणून घ्या काय आहे ही अनोखी परंपरा

Agricultural Tradition : उमरी आणि भोकर परिसरात आंबील बारस उत्साहात; जाणून घ्या काय आहे ही अनोखी परंपरा

latest news Agricultural Tradition: Ambil Baras is in full swing in Umri and Bhokar areas; Know what this unique tradition is | Agricultural Tradition : उमरी आणि भोकर परिसरात आंबील बारस उत्साहात; जाणून घ्या काय आहे ही अनोखी परंपरा

Agricultural Tradition : उमरी आणि भोकर परिसरात आंबील बारस उत्साहात; जाणून घ्या काय आहे ही अनोखी परंपरा

Agricultural Tradition : चैत्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा होणारा 'अंबील बारस' सण जिल्ह्यातील शेतशिवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक विधी, निसर्गपूजा आणि शेतीकामाच्या प्रारंभाने बळीराजाने नव्या हंगामाची सुरुवात केली.(Agricultural Tradition)

Agricultural Tradition : चैत्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा होणारा 'अंबील बारस' सण जिल्ह्यातील शेतशिवारात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पारंपरिक विधी, निसर्गपूजा आणि शेतीकामाच्या प्रारंभाने बळीराजाने नव्या हंगामाची सुरुवात केली.(Agricultural Tradition)

Agricultural Tradition : चैत्र महिना म्हणजे केवळ नवीन वर्षाची सुरुवात नव्हे, तर बळीराजासाठी कृषी संस्कृतीच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ आहे. (Agricultural Tradition)

उमरी तालुक्यासह संपूर्ण परिसरात नुकताच 'आंबील बारस' हा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. (Agricultural Tradition)

निसर्गपूजा, धार्मिक विधी आणि उन्हाळी शेतीकामांचा श्रीगणेशा अशा त्रिवेणी संगमातून पहाटे जिल्ह्यातील शेतशिवारे गजबजून गेली होती.(Agricultural Tradition)

अनादी काळापासून चालत आलेली परंपरा

'आंबील बारस' हा शेतकऱ्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण मानला जातो. भगवान महादेवाच्या नावाने आंबील तयार करून नैवेद्य दाखवण्याची ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

विशेष म्हणजे, या दिवसापासूनच महादेवाच्या यात्रा-उत्सवांना आणि शेतातील उन्हाळी मशागतीच्या कामांना अधिकृतरीत्या सुरुवात केली जाते.

मौन व्रत आणि पहाटेची लगबग

या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे कडक नियम. पहाटे ४ ते ५ वाजेदरम्यान शेतकरी स्नान करून मातीच्या घागरीत आंबील भरतात आणि ती शेतात नेतात.

ही घागर घेऊन शेतात जाताना किंवा परत येताना वाटेत कोणाशीही संवाद साधला जात नाही. हे 'मौन व्रत' पाळत निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आजही ग्रामीण भागात टिकून आहे.

भोकर परिसरातही अनेक शेतकरी कुटुंबांनी पहाटेच आपल्या औताची आणि बळीराजाची पूजा करून हा सण साजरा केला.

आरोग्यदायी आणि चविष्ट 'आंबील'

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शरीराला थंडावा देणारे ज्वारी किंवा नाचणीचे आंबील हे आरोग्यासाठी वरदान मानले जाते.

लसूण, जिरे आणि मिरचीचा तडका देऊन तयार केलेले हे आंबट-गोड पेय केवळ नैवेद्य म्हणूनच नव्हे, तर एक लोकप्रिय आरोग्यदायी पेय म्हणूनही ओळखले जाते.

हे ही वाचा सविस्तर : Mahua Flower : शेतीला जोडधंदा! मोहाच्या फुलांतून आणि 'टोय' तेलातून कष्टकऱ्यांची आर्थिक सुबत्ता

अधिक वाचा : LPG Gas KYC Scam : गॅस केवायसी अपडेट करताना बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे? सायबर पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

Web Title : कृषि उत्सव 'अंबिल बारस' उमरी, भोकर क्षेत्र में उत्साह के साथ मनाया गया।

Web Summary : उमरी और भोकर में प्रकृति पूजा और परंपरा से जुड़ा कृषि उत्सव 'अंबिल बारस' मनाया गया। किसान भगवान महादेव को 'अंबिल' अर्पित करते हैं, मौन व्रत के साथ गर्मी की खेती की शुरुआत करते हैं, जो इस प्राचीन प्रथा के महत्व को उजागर करता है।

Web Title : Agricultural festival 'Ambil Baras' celebrated with enthusiasm in Umari, Bhokar area.

Web Summary : The 'Ambil Baras' agricultural festival, rooted in nature worship and tradition, was celebrated in Umari and Bhokar. Farmers offer 'Ambil' to Lord Mahadev, marking the start of summer farming activities with a silent vow, highlighting the importance of this age-old custom.