Agriculture News : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अनुसूचित जाती विशेष घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती घटकाच्या वैयक्तिक लाभार्थी कृषीपंपधारकांना वीज दरात सवलत देण्यासाठी १७४ कोटी १० लाख महावितरण कंपनीस रोखीने वितरित करण्यास शासन मंजुरी देण्यात आली आहे.
सदर शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेल्या अर्थसहाय्याची रक्कम फक्त अनुसूचित जाती घटकांतर्गत लाभार्थ्यांवरच वीज दरात सवलतीपोटी खर्च होईल याची दक्षता महावितरण कंपनीने घ्यावी. तसेच ज्या उद्देशासाठी सदर निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच उद्देशासाठी तो उपयोगात आणला जाईल याची जबाबदारी महावितरण कंपनीची राहील, असे नमूद करण्यात आले आहे.
सदर मंजूर झालेली रक्कम रु.१७४ कोटी १० लाख रुपये निधी अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई येथून आहरित करुन आहरण व संवितरण अधिकारी मार्फ़त महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांचे नावे स्वतंत्ररीत्या धनादेश काढून वितरित अथवा NEFT/RTGS Fund Transfer द्वारे निधी हस्तांतरित करण्याची कार्यवाही करावी, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान राज्यातील कृषीपंपधारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी महावितरण कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते. अनुसूचित जाती घटकाच्या वैयक्तिक लाभार्थी कृषीपंपधारकांना वीज दरात सवलत देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन २०२५-२६ करिता महावितरण कंपनीस अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी १४३५.०० कोटी इतकी अर्थसंकल्पिय तरतूद केली आहे.
वडिलोपार्जित जमिनीची समान वाटणी झाली नाही, अशावेळी काय करावे, वाचा संपूर्ण प्रक्रिया
