Shetkari Apghat Yojana : गोपीनाथ मुंडे शेतकरीअपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान ही महत्वाची योजना असून, शेती करताना अपघात झाल्यास शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेत शेतमजूरांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्वासाठी २ लाख रुपये आणि आंशिक अपंगत्वासाठी १ लाख रुपयांपर्यंत मदत दिली जाते. ही योजना १० ते ७५ वयोगटातील पात्र शेतकऱ्यांना विना-प्रिमियम कवच प्रदान करते.
योजनेचे स्वरूप पाहुयात
पात्रता : राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (आई-वडील, पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी) यापैकी कोणतीही एक व्यक्तीवयोगट : १० ते ७५ वर्षे
आर्थिक मदत किती मिळते :अपघाती मृत्यू : २ लाख कायमस्वरूपी अपंगत्व : २ लाख आंशिक अपंगत्व : १ लाख
अंमलबजावणी : ही योजना आता 'सानुग्रह अनुदान' तत्त्वावर (विमा कंपनीऐवजी थेट खात्यात) राबवली जाते, ज्यामुळे प्रक्रिया वेगवान झाली आहे. पात्र अपघातांचे प्रकार : रस्ता/रेल्वे अपघात, पिकांवर औषध फवारताना विषबाधा, वीज पडून, सर्पदंश, विंचू दंश, उंचावरून पडून, पाण्यात बुडून, जनावरांचा हल्ला, खून, दंगल इत्यादी
अपवर्जित बाबी (योजना लागू न होणे) : नैसर्गिक मृत्यू, आत्महत्या, गुन्हेगारी कृत्य करताना, मद्यधुंद अवस्थेत, प्रदीर्घ आजार, युद्ध, सैन्यातील नोकरी, भ्रमिष्टपणा, स्वतःहून इजा करून घेणे. अर्ज कोठे करावा : अर्ज ग्रामपंचायत स्तरावर किंवा ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून सादर करता येतात, ज्यानंतर तो कृषी विभागामार्फत मंजूर केला जातो.
सोलार पॅनलपासून शॉक लागून खरंच मृत्यू होतो का, सिस्टीम चालू असताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Web Summary : Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme now includes farm laborers. It provides ₹2 lakh for accidental death or permanent disability and ₹1 lakh for partial disability to farmers and their families aged 10-75. The grant covers accidents like road mishaps, snake bites, and animal attacks, excluding natural death and suicide. Application via Grampanchayat.
Web Summary : गोपीनाथ मुंडे किसान दुर्घटना सुरक्षा योजना में अब खेत मजदूर भी शामिल। दुर्घटना में मृत्यु या स्थायी विकलांगता पर ₹2 लाख और आंशिक विकलांगता पर ₹1 लाख की सहायता। 10-75 वर्ष की आयु के किसान और परिवार पात्र। सड़क दुर्घटना, सर्पदंश, पशु हमले जैसी दुर्घटनाएं शामिल, प्राकृतिक मृत्यु और आत्महत्या नहीं। ग्रामपंचायत में आवेदन करें।