Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > आधारकार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास 50 रुपयांत घरपोच मागवा, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

आधारकार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास 50 रुपयांत घरपोच मागवा, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

Latest news Aadhaar card is lost or damaged, get it delivered to your home for Rs 50, read the complete process | आधारकार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास 50 रुपयांत घरपोच मागवा, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

आधारकार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास 50 रुपयांत घरपोच मागवा, वाचा संपूर्ण प्रक्रिया 

Aadhaar Card : आधार कार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास, तुम्ही नवीन आधार कार्ड घरबसल्या ऑर्डर करू शकता.

Aadhaar Card : आधार कार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास, तुम्ही नवीन आधार कार्ड घरबसल्या ऑर्डर करू शकता.

Aadhaar Card : आधार कार्ड हरवले किंवा खराब झाले असल्यास, तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून (uidai.gov.in) अवघ्या ५० रुपये भरून नवीन आधार PVC कार्ड घरबसल्या ऑर्डर करू शकता. यासाठी 'Order Aadhaar PVC Card' सुविधेचा वापर करा, ज्यामुळे नवीन सुरक्षित कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या नोंदणीकृत पत्त्यावर मिळेल. 

घरबसल्या नवीन आधार कार्ड ऑर्डर करण्याची प्रक्रिया : 
वेबसाईटला भेट द्या :
UIDAI च्या uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा myaadhaar.uidai.gov.in या वेबसाईटवर भेट द्या. 
पर्याय निवडा : 'My Aadhaar' विभागांतर्गत 'Order Aadhaar PVC Card' या पर्यायावर क्लिक करा. 
लॉगिन/आधार तपशील : तुमचा १२ अंकी आधार क्रमांक (UID) किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी (VID) टाका. 
OTP पडताळणी : 'Send OTP' वर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा. 
पेमेंट करा : पडताळणीनंतर ५० रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करा. 
ऑर्डर ट्रॅक करा : पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला एक SRN क्रमांक मिळेल, ज्याद्वारे तुम्ही uidai.gov.in वर स्टेटस ट्रॅक करू शकता. 

महत्त्वाचे - 
मोबाईल नंबर लिंक नसेल तर :
तुम्ही नवीन मोबाईल नंबर वापरूनही PVC कार्ड ऑर्डर करू शकता।
किती वेळ लागतो : नवीन कार्ड १५ दिवसांच्या आत पोस्टाने घरपोच मिळते. 
तातडीचा उपाय : तुम्ही uidai.gov.in वरून तत्काळ ई-आधार (e-Aadhaar) डाउनलोड करू शकता. 

 

Web Title : आधार खो गया? ₹50 में नया PVC कार्ड घर पहुंचाएं।

Web Summary : खोए या खराब आधार कार्ड को आसानी से बदलें। UIDAI की वेबसाइट से ₹50 में ऑनलाइन PVC कार्ड ऑर्डर करें। लिंक किए गए मोबाइल नंबर के बिना भी, 15 दिनों में डिलीवरी ऑर्डर करें और ट्रैक करें। तुरंत ई-आधार डाउनलोड करें।

Web Title : Lost Aadhaar? Get a new PVC card delivered for ₹50.

Web Summary : Replace lost or damaged Aadhaar cards easily. Order a PVC card online for ₹50 via UIDAI's website. Even without a linked mobile number, order and track delivery in 15 days. Download e-Aadhaar instantly.