Join us
Daily Top 2Weekly Top 5

नमो शेतकरी योजनेतुन अनेक शेतकऱ्यांचे पत्ते कट, आठवा हफ्ता 'या' तारखेला मिळू शकतो? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:35 IST

Namo Shetkari Yojana : आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Namo Shetkari Yojana :    महिनाभरापूर्वी पीएम किसान योजनेच्या २१ व्या हफ्त्याचे वितरण करण्यात आले. दुसरीकडे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे. 

आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचवेळी लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित ठेवले जणार आहे. 

महाराष्ट्रातील लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ८ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, हप्ता येण्याआधीच नियमांमध्ये बदल आणि तपासणीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.  कृषी विभागाच्या माहितीनुसार, निकषांची कठोर अंमलबजावणी केल्याने अपात्र लाभार्थी वगळले जात आहेत.

एकीकडे पीएम किसानच्या २० व्या हफ्त्यावेळी सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता, तर २१ व्या हफ्त्या वेळी हा आकडा ९२–९३ लाखांपर्यंत खाली आला. म्हणजेच जवळपास चार ते पाच लाख शेतकऱ्यांना या लाभापासून मुकावे लागले. आता नमो शेतकरी सन्मान निधीच्या बाबतीत हा प्रकार करण्यात आला आहे. 

योजनेतून वगळले जाण्याची प्रमुख कारणे

  • मृत लाभार्थी : सुमारे २८ हजार नावे काढली
  • दुहेरी लाभ : एकाच जमिनीवर दोनदा लाभ घेणारे सुमारे ३५ हजार अपात्र
  • रेशन कार्ड नियम : कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ
  • ITR धारक : आयकर भरणारे किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत शेतकरी अपात्र

 

८ वा हप्ता कधीपर्यंत मिळणार?राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार हप्ता लवकर देण्याच्या तयारीत आहे. ८वा हप्ता डिसेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे. तांत्रिक विलंब झाल्यास १ जानेवारी २०२५ पर्यंत हफ्ता मिळण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Namo Shetkari Yojana: Beneficiaries cut, 8th installment date likely soon.

Web Summary : Many farmers may miss the next Namo Shetkari Yojana installment due to stricter eligibility checks. Around 4-5 lakh farmers were removed. The 8th installment is expected in December or early January 2025.
टॅग्स :कृषी योजनाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रशेतीशेतकरी