Lokmat Agro >शेतशिवार > Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागात एकाच महिन्यात 59 रेक मक्याची वाहतूक, वाचा सविस्तर 

Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागात एकाच महिन्यात 59 रेक मक्याची वाहतूक, वाचा सविस्तर 

Latest News 59 rakes of maize transported in December month in Bhusawal railway division, read in detail | Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागात एकाच महिन्यात 59 रेक मक्याची वाहतूक, वाचा सविस्तर 

Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागात एकाच महिन्यात 59 रेक मक्याची वाहतूक, वाचा सविस्तर 

Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागाने (Bhusaval Railway) डिसेंबर २०२४ या महिन्यात विविध क्षेत्रांतील महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

Agriculture News : भुसावळ रेल्वे विभागाने (Bhusaval Railway) डिसेंबर २०२४ या महिन्यात विविध क्षेत्रांतील महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव :भुसावळ रेल्वे विभागाने (Bhusaval Railway) डिसेंबर २०२४ या महिन्यात विविध क्षेत्रांतील महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. यात मका लोडिंगमध्ये (Maize Transport) विक्रमी कामगिरी केली असून ५९ रेक मका लोड करण्यात आला असून विभागाचा आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

यामुळे विभागाला ३० कोटी १९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून महसुली उत्पन्न १४८ कोटी ९१ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. भुसावळ रेल्वे विभागाने डिसेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करून मागील वर्षाच्या तुलनेत १२.८४ टक्के अधिक आहे.

यात माल वाहतूक उत्पन्नात मागील वर्षांपेक्षा ४८ टक्के जास्त उत्पन्न डिसेंबर महिन्यात मिळाले आहे. तसेच प्रवाशी वाहतूकीतुन देखील चांगले उत्पन्न मिळाले आहे. 

या स्टेशनवरून मका लोड 
मका लोडिंगमध्ये विक्रमी कामगिरी डिसेंबर २०२४ मध्ये ५९ रेक मका लोड होऊन ३० कोटी १९ लाखाचे महसूल मिळाले आहे. मनमाड, लासलगाव, नांदगाव, पाचोरा, जळगाव, खंडवा, अकोला-किल्ला, मलकापूर, खामगाव आणि भुसावळ स्थान- कावरून मकाचे रॅक लोड झाले आहे.

Web Title: Latest News 59 rakes of maize transported in December month in Bhusawal railway division, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.