lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > भंडारा जिल्ह्यात साखर उत्पादनात 10 टक्क्यांची घट, वाचा नेमकं कारण काय?

भंडारा जिल्ह्यात साखर उत्पादनात 10 टक्क्यांची घट, वाचा नेमकं कारण काय?

Latest News 10 percent decrease in sugar production in Bhandara district, read in detail | भंडारा जिल्ह्यात साखर उत्पादनात 10 टक्क्यांची घट, वाचा नेमकं कारण काय?

भंडारा जिल्ह्यात साखर उत्पादनात 10 टक्क्यांची घट, वाचा नेमकं कारण काय?

प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे.

प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भंडारा : सध्या भंडारा जिल्ह्याचे तापमान 45 अंशांवर पोहोचले आहे. प्रखर उन्हाचा ऊस पिकाच्या वजनावर व साखर उत्पादनावर चांगला परिणाम जाणवत आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यात एक मेट्रिक टन उसापासून 100 किलोपर्यंत मिळणारी साखर मे महिन्यात 80 ते 90 किलोपर्यंत घटली आहे. सरासरी 10 टक्के उत्पादनात घट झाली आहे. कडक उन्हाच्या तडाख्याने शेतकरी व साखर कारखानदार संकटात सापडले आहेत.

भंडारा जिल्ह्यात मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे वैनगंगा नदीकाठावर पूर्ती उद्योग समूहाद्वारे संचालित मानस अॅग्रो साखर कारखाना मे महिन्यातही सुरू आहे. या कारखान्याचा गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू करण्यात आला होता. 

कारखान्याने यंदा 2 लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निर्धारित केले होते; परंतु 3 मेपर्यंत 1 लाख 80 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. साखरेचा उतारा 10.50 इतका राहिला आहे. गाळप झालेल्या उसापासून 1 लाख 60 हजार क्विंटल साखर उत्पादन झाले असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

जानेवारी ते मार्च महिना फायदेशीर

ऊस उत्पादक शेतकरी व साखर कार वातावरण लाभदायक असते. या काळ चांगला असतो. या काळात उन्हाचा प चांगले असते. उसाची एक काडी 8 ते तापमानवाढीमुळे उसाच्या काडीचे वजन 1 ते 2 किलोने कमी झाले आहे.


ऊसतोडणीसाठी मजूर मिळेनात

प्रखर उन्हामुळे ऊसतोडणी मजुरांची उणीव भासत आहे. अनेक स्थानिक ऊसतोड मजुरांच्या टोळ्या बंद झाल्या आहेत. अॅडव्हान्स बुडविणे आदी प्रकारामुळे कंत्राटदारांचे नुकसान होत आहे. त्यातच मुदत संपूनही अनेक दिवस तोडणी होत नसल्याने शेतकऱ्यांना मेहनत घ्यावी लागत आहे.

जाळून केली जाते उसाची तोडणी

उन्हाळ्यात उसाच्या शेतात शिरून तोडणी करण्यास मजूर धजावताना दिसत नाहीत. त्यामुळे सायंकाळी उसाच्या उभ्या पिकाला आग लावली जात आहे. पालापाचोळा जळाल्यानंतर उसाची कापणी सुरू केली जात आहे. परिणामी उसाचे वजन झपाट्याने कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

उसाचे पीक १४ ते १५ महिन्यांचे आहे. परिपक्च उसाचे वजन व साखर उतारा चांगला असतो. त्यामुळे शेतकरी व कारखाना दोन्हींचा फायदा - होतो; परंतु प्रखर उन्हामुळे ऊस व साखरेच्या उत्पादनावर १० टक्क्यांनी घट येते.
 - विजय राऊत, महाव्यवस्थापक, मानस अॅग्रो साखर कारखाना, देव्हाडा

Web Title: Latest News 10 percent decrease in sugar production in Bhandara district, read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.