Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Fal Pik Vima : फळ पीकविमा काढला का? 'या' पिकांसाठी आज अखेरची मुदत

Fal Pik Vima : फळ पीकविमा काढला का? 'या' पिकांसाठी आज अखेरची मुदत

Latest Neews fal Pik Vima today 30th june last date for fruit crop insurance | Fal Pik Vima : फळ पीकविमा काढला का? 'या' पिकांसाठी आज अखेरची मुदत

Fal Pik Vima : फळ पीकविमा काढला का? 'या' पिकांसाठी आज अखेरची मुदत

Fal Pik Vima : अधिक माहितीसाठी www.pmfby. gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे देखील कळविण्यात आले आहे.

Fal Pik Vima : अधिक माहितीसाठी www.pmfby. gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे देखील कळविण्यात आले आहे.

नाशिक : हवामान आधारित फळ पीकविमा योजनेंतर्गत (Fal Pik Vima) जिल्ह्यासाठी मृग बहारात लिंबू, सीताफळ, चिकू, डाळींब, पेरु, द्राक्ष या फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. योजनेत सहभागासाठी सोमवारी अखेरची मुदत आहे. मोसंबी ,चिकू  ३० जून, तर लिंबू, द्राक्ष, पेरू, संत्रा : १४ जून, डाळिंब  १४ जुलै , सीताफळ ३१ जुलै पर्यंत पीक विमा उतरवता येणार आहे. 

द्राक्ष या फळ पिकासाठी (Grape Crop Insurance) विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी १९ हजार रुपये आहे. द्राक्ष बहुल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अधिक माहितीसाठी www.pmfby. gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे देखील कळविण्यात आले आहे. जिल्ह्यातील ४० टक्के शेतकऱ्यांनी अद्यापही विमा काढला नसल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.


फळ पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत, हवामानावर आधारित फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. ज्यामध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई आणि स्टॉबेरी या नऊ फळपिकांचा समावेश आहे. 

योजनेत भाग घेण्यासाठी आवश्यक बाबी पुढीलप्रमाणे आहे. 
Agri stack नोंदणी क्रमांक , आधार कार्ड, बँक पासबुक, जमीन धारणा उतारा, Geo tag फोटो ,ई – पिक पहाणी बंधनकारक आहे, ई पीक पाहणी नोंद नसल्यास पिक विमा अर्ज रद्द होऊ शकतो. ई पीक नोंदणी पिक विम्यात भाग घेतल्यानंतर जुलै – ऑगस्ट महिन्यात करू शकतात.जास्त माहिती घेण्यासाठी नजिकच्या विमा कंपनी कार्यालय , तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे .

 

 

Web Title: Latest Neews fal Pik Vima today 30th june last date for fruit crop insurance