Nafed Kanda Kharedi : नाफेडची कांदा खरेदी (Kanda Kharedi) डोकेदुखी ठरत आहे. निविदा प्रक्रिया सोडली तर त्यानंतर कोणत्याच प्रक्रियेचा नीटसा थांगपत्ता लागत नसल्याचे चित्र आहे. गेल्या दोन तीन आठवड्यापासून कांदा खरेदीला मुहूर्त मिळत नाही.
त्यातच कांदा खरेदीदारांची (Onion Buyers List) यादी व्हायरल झाली आहे. संबंधित खरेदीदारांकडून कांदा खरेदी होणार असून सद्यस्थितीत त्यांच्याकडून खरेदीबाबतच्या काही प्रक्रिया पार पडल्या जात असल्याचे समजते आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून नाफेड कांदा खरेदीची (NAFED) चर्चा आहे. दरम्यान दोन दिवसांपासून कांदा खरेदीदारांची यादी व्हायरल झाली आहे. तत्पूर्वी नाफेड यंदा विकास सोसायट्यांना सहभागी करून घेत आहे. तर एनसीसीएफ फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना हाताशी धरत आहे. या दोन्ही संस्थांच्या खरेदीदारांची यादी समोर आली आहे.
नाफेडकडून १४ विकास सोसायटया, तर एनसीसीएफकडून २९ खरेदीदार संस्था यांच्या नावांची यादी व्हायरल आली आहे. आता यापैकी काही खरेदीदार संस्था, सोसायट्या कमी होण्याची शक्यता आहे.
नाफेडची यादी पाहूया.....
- इंदुमती बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड
- नाशिक शेतकरी सहकारी संघ लिमिटेड कळवण नाशिक
- चांदवड तालुका बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था चांदवड
- बाळासाहेब ठाकरे अटल निविण्यपूर्ण सहकारी संस्था दिंडोरी,
- द सप्तर्षी फार्मर्स प्रोडूसर को-ऑपरेटिव्ह सोसायटी
- ब्रह्मगिरी कृषी सेवा अटल अभिनव सहकारी संस्था मर्यादित नाशिक
- शरद अटल नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय संस्था मर्यादित कळवण
- आंबेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड आंबेगाव
- दावचवाडी विविध कार्यकारी विकास संस्था निफाड
- कर्मवीर भाऊसाहेब हिरे नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संघ नाशिक
- ओमकार बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित निफाड
- देवी अहिल्या फळबाग खरेदी विक्री संघ चांदवड,
- पिंपळगाव बसवंत सहकारी खरेदी विक्री संघ पिंपळगाव,
- कृषी साधना महिला सहकारी फळे भाजीपाला संस्था
तसेच एनसीसीएफची यादी पाहुयात...
- पुनद सागर FPCL अभोणा, कळवण
- साईलीला अभोणा
- श्री वेंकटेश्वर, सिन्नर
- माळमाथा शेतकरी FPCL मुंगसे, माळेगाव
- कळवण देवळा परिसर FPCL, उमराणे
- प्रबळगड FPCL, उमराणे
- फार्म स्टोन FPCL, वणी
- गणेश ज्योती FPCL, सिन्नर
- शिवनेरी महिला FPCL, मालेगाव
- उमराणे FPCL
- सोझी ॲग्रो FPCL, उमराणे
- गिरणा काठ FPCL, पाटणे, मालेगाव
- किल्ले गोलणा, मालेगाव
- प्रेणिक FPCL, कळवण
- श्री बाणगंगा FPCL, पिंपळगाव बसवंत
- कृषी विचार FPCL, मालेगाव
- रामेश्वर कृषी कल्याण फेडरेशन, सटाणा
- नारी सन्मान ऍग्रो FPCL, मालेगाव
- गंगा FPCL, मुंगसे, मालेगाव
- सुमन सिद्धू, ताहाराबाद
- वीरभद्र FPCL, सायखेडा
- चंद्रेश्वर FPCL, निफाड
- गिरणेश्वर FPCL, उमराने.
- शाहू FPCL, मनमाड
- कृष्णकुंज FPCL, पिंपळगाव बसवंत
- फाईव्ह स्टार ग्रीन FPCL, देवळा
- सातमाने FPCL, दिंडोरी
- श्री कपालेश्वर FPCL, नामपूर
- वुमन्स झोन FPCL, झाडी, मालेगाव
यादीनुसार या 29 संस्था असून यातील निवडक संस्थांना सहभागी करून घेण्यात येणार आहे.