Lokmat Agro >शेतशिवार > शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार

शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार

Lands auctioned for government arrears and deposited with the government will be returned to the original account holders. | शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार

शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार

Maharashtra Jamin Mahsul Sanhita १९६६ : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

Maharashtra Jamin Mahsul Sanhita १९६६ : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंजूरी देण्यात आली.  तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारीपड म्हणून शासन जमा करण्यात येतात.  

अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे.  तथापि १२ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती.

आता अशा जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या २५ टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  तसे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल.

हेही वाचा : जायकवाडीसाठी दुष्काळाचा अंदाज घेऊन पाणी सोडणार; वाचा मराठवाड्यासाठी महत्वाचा असलेला 'हा' निर्णय

Web Title: Lands auctioned for government arrears and deposited with the government will be returned to the original account holders.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.