कोपार्डे : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने १६ ते ३१ डिसेंबर २०२५ अखेर गळितास आलेल्या उसाची ३२ कोटी २३ लाख ६ हजार रक्कम शुक्रवारी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
ते म्हणाले, १६ ते ३१ डिसेंबरअखेर ९० हजार ५३५ मे. टन ऊस गळितास आला. या उसाचे प्रतिटन ३ हजार ५६० रुपयांप्रमाणे एकूण ३२ कोटी २३ लाख रुपये शुक्रवारी ऊस पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत.
२९ जानेवारी २०२६ अखेर ४ लाख ४ हजार १५० मे. टन ऊस गाळप करून ४ लाख ९० हजार ८९० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा १२.३ टक्के आहे.
यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, दीपक चौगुले, आदी उपस्थित होते.
अधिक वाचा: यंदाच्या गाळपात रिकव्हरी अर्थात साखर उतारा जेमतेम; काय दरांनी मिळतील उसाची बिले?
Web Summary : Kumbhi-Kasari sugar factory deposited ₹32.23 crore for sugarcane supplied till December 31st, 2025, at ₹3,560 per ton. Till January 29th, 2026, 4,04,150 metric tons of sugarcane were crushed, producing 4,90,890 quintals of sugar with a 12.3% recovery rate.
Web Summary : कुंभी-कासारी चीनी कारखाने ने 31 दिसंबर, 2025 तक आपूर्ति किए गए गन्ने के लिए ₹3,560 प्रति टन की दर से ₹32.23 करोड़ जमा किए। 29 जनवरी, 2026 तक 4,04,150 मीट्रिक टन गन्ने की पेराई की गई, जिससे 12.3% की रिकवरी दर के साथ 4,90,890 क्विंटल चीनी का उत्पादन हुआ।