Lokmat Agro >शेतशिवार > Kharif Season: खरीप हंगामाची जोरदार तयारी: 'या' जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष्य

Kharif Season: खरीप हंगामाची जोरदार तयारी: 'या' जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष्य

Kharif Season: latest news Vigorous preparations for the Kharif season: Target of sowing soybeans in more than half the area in 'this' district | Kharif Season: खरीप हंगामाची जोरदार तयारी: 'या' जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष्य

Kharif Season: खरीप हंगामाची जोरदार तयारी: 'या' जिल्ह्यात अर्ध्याहून अधिक क्षेत्रावर सोयाबीन पेरणीचे लक्ष्य

Kharif Season: अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून, शेतकरी मशागतीत गुंतले आहेत तर कृषी विभागाकडून नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यंदा कृषी विभागाने काय नियोजन केले आहे ते जाणून घ्या सविस्तर(Kharif season)

Kharif Season: अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू असून, शेतकरी मशागतीत गुंतले आहेत तर कृषी विभागाकडून नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यंदा कृषी विभागाने काय नियोजन केले आहे ते जाणून घ्या सविस्तर(Kharif season)

शेअर :

Join us
Join usNext

विवेक चांदूरकर

अकोला जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. शेतकरी मशागत करण्यात मग्न असून शासकीय स्तरावरही नियोजनाची लगबग सुरू आहे. (Kharif season)

जिल्ह्यात सोयाबीनची २ लाख ४२ हजार ५०२ हेक्टरवर पेरणी अपेक्षित असून, त्याकरिता ९८ हजार ५०० क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच अन्य पिकांसाठी खत व बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. (Kharif season)

खरीप हंगामासाठी कृषी विभागाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ४ लक्ष ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होणार आहे. यामध्ये २ लाख ४२ हजार ५०२ हेक्टरवर सोयाबीन, १ लक्ष २७ हजार ३०० हेक्टरवर कपाशी, ६५ हजार हेक्टरवर तूर, ३४८० हेक्टरवर मूग, ३ हजार हेक्टरवर उडीद, २ हजार हेक्टरवर खरीप ज्वारीचे नियोजन करण्यात आले आहे. एकूण पेरणी नियोजन क्षेत्रफळापैकी जवळपास ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात येणार आहे. (Kharif season)

तीन महिन्यात उत्पन्न देणारे सोयाबीन सध्या जिल्ह्यातील प्रमुख पीक बनले आहे. याकरिता खतांची अंदाजे मागणी ९३ हजार १०० मे. टन असून, मंजूर आवंटन ९३ हजार ७९६ मे. टन आहे.

ऐन हंगामात तुटवडा निर्माण होत असल्याने काही शेतकरी आतापासूनच बियाणे व खत खरेदी करीत आहेत. हंगामात जादा दरातही शेतकऱ्यांना बियाणे व खताची विक्री करण्यात येते. त्यामुळे शेतकरी मे महिन्यातच बियाणे व खत खरेदी करतात.

कपाशीसाठी ६ लाख ३६ हजार पाकिटांची मागणी

* कपाशीची पेरणी १ लाख २७ हजार ३०० हेक्टरवर नियोजित आहे. याकरिता ६ लाख ३६ हजार ५०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.

* तसेच मूग, उडीद, सोयाबीन, कपाशी अशी सर्व पिके मिळून ७० हजार ४३४ क्विंटल बियाण्यांची मागणी आहे.

कपाशीचे बियाणे मिळणार २५ मेपासून

* कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. बोंडअळीमुळे कपाशीच्या उत्पादनात घट येते. बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जून महिन्याच्या १ तारखेनंतर कपाशीची पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते.

* बियाणे ही १ जून नंतरच बाजारात उपलब्ध करून देण्यात येते. यावर्षी मात्र २५ मे पासून कपाशीचे बियाणे बाजारात उपलब्ध होणार आहे. बियाणे उपलब्ध होत असले तरी पेरणी मात्र १ जून नंतरच करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Cotton Seeds : कापूस उत्पादकांच्या खिशाला बसणार महागाईची झळ वाचा सविस्तर

Web Title: Kharif Season: latest news Vigorous preparations for the Kharif season: Target of sowing soybeans in more than half the area in 'this' district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.