Join us

kalaunjee cultivation : वाशिममध्ये झाली कलौंजीची लागवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 10:46 IST

kalaunjee cultivation : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवे प्रयोग करून आपल्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक आगळावेगळा प्रयोग वाशिम येथील शेतकरी संजय लोणसुने यांनी केला आहे. वाचा सविस्तर

वाशिम : जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवनवे प्रयोग करून आपल्या उत्पन्नात भर टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. असाच एक आगळावेगळा प्रयोग वाशिम येथील शेतकरी संजय लोणसुने यांनी केला आहे.

त्यांनी दोन एकर क्षेत्रात कलौंजी(kalaunjee) पिकाची लागवड(cultivation) केली आहे. त्यांचे हे पीक(Crop) चांगलेच बहरले असून, सद्यःस्थितीत फुलोऱ्यात आहे. कलौंजी हे एक मसालावर्गीय पीक आहे. आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा वापर केला जातो.

याला 'काळे तीळ' असेही संबोधले जाते. कलौंजीच्या लहान, काळ्या बियांची चव किंचित कडू आणि सुगंधी असते. कलौंजीमुळे जेवणाची चव वाढतेच, शिवाय यातील पोषकतत्त्व आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे रब्बी हंगामात घेतले जाणारे आणि कमी पाण्यात, कमी दिवसांत येणारे पीक आहे.

वन्यप्राण्यांचा त्रास नाही

रब्बी हंगामातील हरभरा, गहू, मका आदी पिकांना वन्यप्राण्यांचा मोठा धोका असतो. तथापि, कलौंजीच्या पिकाला वन्यप्राण्यांचा कसलाही धोका नसल्याने शेतकऱ्यांना याची राखण करावी लागत नाही.

आरोग्यासाठी फायदेशीर

* कलौंजीच्या बियांमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, सी, बी-कॉम्प्लेक्स, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यांसारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.

* हे पोषकतत्त्व पचन व्यवस्थित ठेवण्यास आणि प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

* कलौंजी चहा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.हे ही वाचा सविस्तर : Maharshtra Weather Update : 'या' जिल्ह्यांसाठी अवकाळी पावसाचा अलर्ट; IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रपीकलागवड, मशागतशेतकरीशेतीवाशिम