Join us

गाळप हंगामाचा निर्णय बुधवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:51 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार असून, या बैठकीला उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

यंदा राज्यातील ऊस गाळप हंगाम सुरू करण्याबाबत बुधवारी (दि. १८) निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समिती हा निर्णय घेण्यात येणार असून, या बैठकीला उपमुख्यमंत्री व जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

यंदा राज्यात १ हजार २२ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असून, इथेनॉलकरिता वळविण्यात येणाऱ्या साखरेव्यतिरिक्त ८८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी हेच उत्पादन १०५ लाख टन इतके झाले होते. कर्नाटकमध्ये गाळप हंगाम लवकर सुरू होणार या शंकेने ही मागणी होत आली होती.

टॅग्स :साखर कारखानेऊसकर्नाटकदेवेंद्र फडणवीसएकनाथ शिंदेअजित पवार