जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक तपासणी केली जाते. पाण्याचा नमुना पिण्यास योग्य आहे की नाही, याचा अहवाल प्राप्त होतो.
तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालय संकेतस्थळावर कुणालाही पाहता येतो. म्हणजेच एखाद्या गावाचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे कोणालाही कळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
पाण्यातील जीवजंतूचीही माहितीहे पाणी जर निकृष्ट दर्जाचे असेल तर त्यातील जीवजंतूची माहितीही या अहवालात नमूद करण्यात आलेली असते. या पाण्यातील अहवालानुसार आम्लता, क्षारता याचे प्रमाण समजते. त्यामुळे ते पिण्यायोग्य आहे का, हे लक्षात येते.
सिटिझन कॉर्नर' म्हणजे काय?नागरिकांना आपल्याशी संबंधित प्रत्येक शासकीय, निमशासकीय बाबींच्या पाहणीसाठी सिटिझन कॉर्नर ही सुविधा शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पाण्याची माहिती कशी तपासायची?केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या संकेतस्थळावर राज्य, जिल्हा, तालुका आणि गावचे नाव निवडले की त्या गावातील पाण्याचा अहवाल पाहता येतो.
गुणवत्तेनुसार रंगीत कार्ड◼️ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्रत्येक गावातील पाण्याची तपासणी करण्यात येते आणि त्या त्या गावांना पाण्याच्या दर्जानुसार लाल, पिवळे आणि हिरवे कार्ड देण्यात येते.◼️ लाल रंगाचे कार्ड मिळाले तर ते पाणी पिण्यास अयोग्य असते. पिवळ्या रंगाचे कार्ड असेल तर तिथे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी वाव असल्याचे निश्चित होते. तर, हिरवे कार्ड असेल तर ते पाणी पिण्यायोग्य समजले जाते.
रासायनिक आणि जैविक तपासणी अहवालपाण्याची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी रासायनिक आणि जैविक अहवाल महत्त्वाचा असतो. याचीच माहिती संकेतस्थळावर पाहता येतो.
अधिक वाचा: शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या विकास संस्थांच्या शिस्तीसाठी केंद्राने घेतला 'हा' निर्णय