sukanya samriddhi yojana वाढत्या महागाईच्या काळात मुलींच्या उच्च शिक्षणापासून करिअरपर्यंतचा खर्च झपाट्याने वाढत आहे.
अशा स्थितीत मुलीच्या भविष्यासाठी सरकारी हमी असलेली सुकन्या समृद्धी योजना सर्वात सुरक्षित आणि जास्त फायदा देणारी योजना ठरत आहे.
केवळ १५ वर्षे गुंतवणूक करून, मुलीच्या २१व्या वर्षी पालकांना तब्बल ७१ लाख रुपये करमुक्त रक्कम मिळू शकते. कसे ते जाणून घेऊ.
शिक्षण, परदेशी अभ्यासक्रम, करिअर किंवा उद्योजक होण्यासाठी ७१ लाख रुपयांची करमुक्त रक्कम मुलीची प्रत्येक स्वप्नपूर्ती करण्यास सक्षम ठरू शकते. हा उपक्रम मुलीच्या भवितव्याचे मजबूत कवच ठरत आहे.
तीन वर्षांच्या मुलीसाठी आखलेली योजना◼️ वार्षिक गुंतवणूक : १.५० लाख रुपये (कमाल मर्यादा)◼️ एकूण मुदत : १५ वर्षे◼️ व्याजदर : ८.२% प्रतिवर्ष◼️ एकूण गुंतवणूक : २२.५० लाख रुपये◼️ मॅच्युरिटी : मुलीचे वय २१ वर्षे◼️ मिळणारी रक्कम : अंदाजे ७१ लाख रुपये (पूर्णपणे करमुक्त)
खाते कोण उघडू शकतो?◼️ मुलीचे वय १० वर्षांखाली असणे आवश्यक.◼️ जास्तीत जास्त दोन मुलींसाठी २ खाती.
अधिक वाचा: राज्यात ‘या’ प्रकारातील लाभार्थ्यांचे रेशनकार्ड होणार आता रद्द; पुरवठा विभागाची नवी मोहीम सुरु
Web Summary : Secure your daughter's future with Sukanya Samriddhi Yojana. Invest for 15 years and receive approximately ₹71 lakhs tax-free at age 21. This scheme covers education and career expenses, offering high returns and financial security for girls.
Web Summary : सुकन्या समृद्धि योजना के साथ अपनी बेटी का भविष्य सुरक्षित करें। 15 साल तक निवेश करें और 21 साल की उम्र में लगभग ₹71 लाख कर-मुक्त प्राप्त करें। यह योजना शिक्षा और करियर के खर्चों को कवर करती है, जो लड़कियों के लिए उच्च रिटर्न और वित्तीय सुरक्षा प्रदान करती है।