Join us

शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, तंत्रज्ञान आणि भविष्यातील शेती नायकांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 12:34 PM

भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान आणि (फाली) भविष्यातील शेती नायकांची आवश्यता आहे. आपण दररोज भोजन करतो त्या शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाने कृतज्ञतेचा नमस्कार करायला हवे असे मोलाचे विचार जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले.

जळगाव : भरघोस उत्पन्न अन् शाश्वत शेतीसाठी नावीन्यता, शास्त्र-तंत्रज्ञान आणि (फाली) भविष्यातील शेती नायकांची आवश्यता आहे. आपण दररोज भोजन करतो त्या शेतकऱ्यांप्रती प्रत्येकाने कृतज्ञतेचा नमस्कार करायला हवे असे मोलाचे विचार जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी व्यक्त केले. फालीच्या पहिल्या सत्रातील बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन व इन्होंव्हेशन प्रेझन्टेशन विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  

यावेळी सुसंवाद साधताना तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. पुण्य, पैसा आणि आशीर्वाद हे शेती व शेतीशी संबंधीत व्यवसाय केल्याने मिळतात, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाचा रस्ता अडविण्यापेक्षा पाणी अडवा, कुणाची जिरविण्यापेक्षा पाणी जिरवा, तिसरी गोष्ट म्हणजे कुणाची लावालावी करण्यापेक्षा झाडे लावा त्यामुळे पर्यावरण आणि पर्यायाने सर्वांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल होतील.

शेतीला व्यापार व्यवसाय या दृष्टीने बघावे म्हणते शाश्वत शेती करू शकाल. यावेळी जितके अन्न आवश्यक असेल तितकेच घेईल, अन्न वाया घालविणार नाही याची शपथही अतुल जैन यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर नॅन्सी बॅरी यांच्यासह फालीसाठी सहयोग करणाऱ्या ११ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अधिवेशनची आज पहिल्या सत्राचा समारोप झाला. यावेळी अतुल जैन बोलत होते. 

जैन हिल्सच्या आकाश मैदानावर कंपनी प्रतिनिधींच्या उपस्थित नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन, बिझनेस प्लॅनचे सादरीकरणामधील विजेत्यांना टीशर्ट, चषक, मेडल देऊन गौरविण्यात आले. अॅग्रीकल्चर एज्युकेटरचासुद्धा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर महेंद्रा कंपनीचे दीपक ललवाणी, प्रॉम्प्ट कंपनीचे नरेश पाटील, ध्रुव वाघेला, आयटीसीचे सहयोग तिवारी, शैलेंद्रसिंग, स्टार अॅग्रीचे निवेश जैन, इमरान कांचवाला उपस्थित होते. 

तसेच यूपीएल कंपनीचे अविनाश ठाकरे, योगेश धांडे, गोदरेज अॅग्रोवेटचे विनोद चौधरी, डॉ. आकाश, अमूलचे परेश पाटील, मौलिक कांबळे, नाबार्डचे श्रीकांत झांबरे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील, किशोर रवाळे उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी तर भाषा अनुवाद रोहिणी घाडगे यांनी केले. फालीच्या १० वर्षे वाटचालीबाबत व पुढील योजनांबाबत फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांनी उपस्थितांशी इंग्रजीतून संवाद साधला.

बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन विजेते हर्बल न्युट्रिशियस रागी - नवमहाराष्ट्र विद्यालय पंधरे पुणे (प्रथम)कार्बन फार्मिंग - एफ एम खंडेलवाल हायस्कूल शिरूड जि धुळे (द्वितीय)ॲग्रिमजदूर मोबाईल ॲल्पिकेशन - सी एम राईस गव्हर्नमेंट हायर सेकडरी स्कूल शिवाजी नगर इंदौर मध्यप्रदेश, (तृतीय)जन औषधी सुविधा सॅनेटरी नॅपकीन - बी. डी. आदर्श विद्यालय केलवड जि. नागपूर (चौथा)यलो ॲण्ड ब्यु स्टिकी ट्रॅप्स - परशुराम नाईक विद्यालय बोरगावमंजू जि. अकोला (पाचवा) क्रमांकाचे विजेते ठरले.

नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन विजेतेमल्टीपर्पज फार्मिंग - न्यू इंग्लिश स्कूल फॉर मलकापूर जि. कोल्हापूर (प्रथम)सायकल स्प्रेईंग इक्विपमेंट - आचार्य गजाननराव गरुड सेकंडरी स्कूल शेंदुर्णी जि. जळगाव (द्वितीय)ऑटोमेटिक इरिगेशन सिस्टिम्स - जयदीप रेसिडेन्शीयल कळंब जि. यवतमाळ (तृतीय)फल्टीलायझर ॲप्लिकेटर - श्रीमती अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय वरेधरना जि. नाशिक (चौथा)सोलार पॅनल स्प्रेईंग मशीन - पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव बसवंत जि. नाशिक (पाचवा) क्रमांकाने विजयी झाले.

विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन व बिझनेस प्लॅन सादरीकरणदुपारच्या सत्रात जैन हिल्स येथे विद्यार्थ्यांनी बिझनेस प्लॅन व इंहोव्हेशन सादरीकरण केले.भुईमूग शेंगा सोलणी यंत्र - (नवजीवन सेकंडरी आश्रम स्कूल आंबा तांडा)इंहोव्हेटिव्ह फार्म मल्टी पर्पज मॉडेल - (गुरु दयाल सिंग राठोड सेकंडरी आश्रम स्कूल गराडा)सायकल स्प्रे इक्विपमेंट - (आचार्य गजाननराव गरुड सेकंडरी स्कूल शेंदुर्णी)फॉर्म सिक्युरिटी अलार्म - (राणीदानजी जैन सेकंडरी आणि श्रीमती कांताबाई जैन हायर सेकंडरी स्कूल वाकोद)फर्टीलायझर एप्लीकेटर मॉडेल - (जनता विद्यालय चाटोरी)सोलर व्हेजिटेबल ड्रायर - (वसंतराव नाईक सेकंडरी आश्रम स्कूल तेलवाडी)शेंगदाणा काढणी यंत्र - (स्वामी प्रणव आनंद सरस्वती हायस्कूल कालीमठ)फर्टीलायझर स्प्रेडर - (श्रीमती राधाबाई शिंदे हायस्कूल हस्ता)फर्टीलायझर एप्लीकेटर - (अनुसयाबाई भालेराव माध्यमिक विद्यालय)मल्टीपर्पज फार्म मशीन, लाईव्ह सेविंग स्टिक - (छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय खेडगाव)सोलर पॅनल स्प्रेईंग मशीन - (पिंपळगाव हायस्कूल पिंपळगाव बसवंत)अॅग्रीकल्चर मल्टीपर्पज इम्प्लिमेंट श्रीराम विद्यालय, मल्टीपर्पज एग्रीकल्चर बायसिकल - (प्रकाश हायस्कूल मालेगाव)सोलार फेन्सिंग सिस्टीम - (न्यू इंग्लिश हायस्कूल मोहपा)इलेक्ट्रिक कल्टीवेटर - (म्युन्सिपल हायस्कूल कलमेश्वर)मल्टीपर्पज कल्टीवेटर, सोलर वॉटर पंप, मॉडर्न ओनियन स्टोरेज - (पीएम रुईकर ट्रस्ट हायस्कूल नांजा)व्हेंटिलेटर ओनियन स्ट्रक्चर - (माणिकराव पांडे विद्यालय फालेगाव)फळ आणि भाजीपाला ड्रायर - (राजापूर हायस्कूल राजापूर)एक हॅचरी मशीन, काजू हार्वेस्टर, झिरो बजेट शेण गोळा करण्याचे यंत्र, हॅन्डविडर, फर्टीलायझर डिस्ट्रीब्यूटर, शेवगा शेंग काढणी यंत्र, सीड डिबलर मशीन, फार्मस्टिक, सायकल होल, ऑटोमॅटिक ट्रॅक्टर अशा सुमारे ५८ मॉडेल्सची मांडणी जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर करण्यात आली होती.

टॅग्स :शेतकरीशेती क्षेत्रतंत्रज्ञानशेतीव्यवसायजैन पाइपशाळाविद्यार्थीसंशोधनजळगाव