Join us

कोल्हापूर साखर सहसंचालकांचा पुढाकार; खुशाली रोखण्यासाठी सुरु केला व्हॉट्सअॅप ग्रुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:01 IST

ऊसतोडीसाठी मागितली जाणारी खुशाली रोखण्यासाठी शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या पुढाकाराने संघटना, साखर कारखान्याचे अधिकारी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला.

शिरोळ : ऊसतोडीसाठी मागितली जाणारी खुशाली रोखण्यासाठी शिरोळ तालुक्यात प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांच्या पुढाकाराने संघटना, साखर कारखान्याचे अधिकारी यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला.

या ग्रुपवर पहिल्या दिवशी दत्त-शिरोळ व आवाडे-हुपरी या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील दोन शेतकऱ्यांच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

'लोकमत'ने गत आठवड्यात 'उसाच्या फडावर खंडणीचा कोयता' या वृत्तमालिकेच्या माध्यमातून खंडणीच्या कूप्रथेवर जोरदार प्रहार केला होता. गुरुवारी (दि. २) शिरोळ येथे साखर कारखाना प्रतिनिधी, आंदोलन अकुंश संघटना यांची प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या पढाकाराने बैठक झाली.

यावेळी खुशाली रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्याचे ठरले होते. यानुसार सोमवारी प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे यांनी ग्रुप तयार केला.

यात दत्त शिरोळ, आवाडे हुपरी, पंचगंगा इचलकरंजी, शरद नरंदे व गुरुदत्त टाकळीवाडी या कारखान्यांचे कार्यकारी संचालक व शेती अधिकारी तसेच आंदोलन अंकुशचे दोन प्रतिनिधी, प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयाचे तीन प्रतिनिधी यांचा समावेश केला आहे.

पहिल्याच दिवशी दोन तक्रारी दाखलइन्ट्री-खुशाली-क्रमपाळी तक्रार निवारण असे या ग्रुपला नाव दिले आहे. पहिल्याच दिवशी दत्त-शिरोळ व आवाडे-हुपरी कारखाना कार्यक्षेत्रातील दोन शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली आहे. याची शहानिशा कारखाने करणार असून, संबंधित वाहतूकदाराच्या बिलातून पैसे कापून ते परत केले जाणार आहेत.

आंदोलन अंकुशचा पाठपुरावाशेतकऱ्यांना थेट कारखान्याकडे खुशालीबाबत तक्रार करण्यास अडचणी येतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन अंकुशकडे तक्रारी कराव्यात. आम्ही त्याचा पाठपुरावा करू, तसेच ज्याच्याकडून पैसे घेतले असतील त्यानी कोणतीही भीती न ठेवता संपर्क करावा, असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी केले आहे.

टॅग्स :साखर कारखानेऊसकोल्हापूरकाढणीसरकारशेतकरी