Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > भातावर खोड किडीचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण

भातावर खोड किडीचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण

Infestation of stem borer on rice; How to control | भातावर खोड किडीचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण

भातावर खोड किडीचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण

कृषी विभागाकडून तालुक्यामध्ये क्रॉपसॅप योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत भात पिकांच्या कीड रोगांची निरीक्षणे वेळोवेळी मोबाइल अॅपच्या माध्यमातून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

कृषी विभागाकडून तालुक्यामध्ये क्रॉपसॅप योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत भात पिकांच्या कीड रोगांची निरीक्षणे वेळोवेळी मोबाइल अॅपच्या माध्यमातून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

तळा तालुक्यातील रोवळा व वरळ या भागांमध्ये भात पिकावरती पिवळ्या खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे भाताच्या उत्पादनात घट येत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कृषी विभागाकडून तालुक्यामध्ये क्रॉपसॅप योजना राबवली जात आहे. या योजनेंतर्गत भात पिकांच्या कीड रोगांची निरीक्षणे वेळोवेळी मोबाइल अॅपच्या माध्यमातून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या अंतर्गतच निरीक्षणे घेत असताना खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आले आहे. खोड किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग प्रत्यक्ष शेतावरती जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.

खोड किडी विषयी मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव यांनी माहिती देताना सांगितले की, खोड कीड ही भात पिकावरील एक मुख्य कीड असून तिचे वेळीच नियंत्रण केले पाहिजे. सध्या तालुक्यात उष्ण व दमट हवामान असल्याने काही गावांमध्ये किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे या किडीची अळी सुरूवातीस काही वेळ कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच "गाभामर" असे म्हणतात. टरीतील पिकावर देखील खोडकीडीचा उपद्रव आढळून येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात यालाच पळींज किंवा पांढरी पिशी असे म्हणतात. परिणामतः भाताच्या उत्पादनात घट येते असते असे त्यांनी सांगितले.

अधिक वाचा भात पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि त्यांचे व्यवस्थापन

 

किडीचे नियंत्रण
-
पिकाची वरचेवर पाहणी करून कीड ग्रस्त फुटवे काढून नष्ट करावेत. हे काम हंगामातून तीन ते चार वेळा करावे. शेतात पक्षी थांबे लावावेत.
- जर शेतामध्ये ५ टक्के कीड ग्रस्त फुटवे दिसल्यास, फवारणीसाठी क्विनॉलफॉस ३.२ मिली या कीटकनाशकाची प्रतिलिटर पाण्यामध्ये फवारणी करावी.

अधिकच्या माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहायक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करण्याचे आवाहन सचिन जाधव यांनी केले आहे.

Web Title: Infestation of stem borer on rice; How to control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.