Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > कुठे १० क्विंटल तर कुठे फक्त ३ क्विंटल उतारा! हरभरा पिकाला बसला यंदा रोगराईचा फटका

कुठे १० क्विंटल तर कुठे फक्त ३ क्विंटल उतारा! हरभरा पिकाला बसला यंदा रोगराईचा फटका

In some places, 10 quintals were harvested, while in others, only 3 quintals were harvested! The gram crop was hit by disease this year. | कुठे १० क्विंटल तर कुठे फक्त ३ क्विंटल उतारा! हरभरा पिकाला बसला यंदा रोगराईचा फटका

कुठे १० क्विंटल तर कुठे फक्त ३ क्विंटल उतारा! हरभरा पिकाला बसला यंदा रोगराईचा फटका

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे.

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे.

अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील महान व आसपासच्या भागातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा रब्बी हंगामात मिश्र परिणामांना सामोरे जावे लागत आहे.

काही शेतकऱ्यांना प्रतिएकर ७ ते १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळत असताना, उशिरा पेरणी केलेल्या पिकांवर रोगराई आल्याने अनेकांना फक्त २ ते ३ क्विंटलपर्यंतच उतारा मिळत आहे.

यावर्षी चांगल्या पावसामुळे धरणे व तलाव भरले तसेच विहिरी व बोअरवेलमध्येही पाणी उपलब्ध राहिले. त्यामुळे परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात गहू व हरभरा पेरणी केली.

नोव्हेंबरमध्ये पेरणी झालेल्या हरभरा पिकाची कापणी सुरू असून, त्या पिकाला समाधानकारक उत्पादन मिळत आहे; मात्र डिसेंबरमध्ये पेरणी केलेल्या पिकांवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने झाडे पिवळी पडून सुकली. काही भागांत शेंगा कमी लागल्यानेही उत्पादन घटले.

४ हजार रुपये सोंगणीचा दर

यंदा महान व परिसरात हरभरा पेरणीचे क्षेत्र वाढल्याने काढणी हंगामात मजुरांच्या मजुरी दरात वाढ झाली आहे. खेडेगावांतील मजूर हरभरा सोंगणीसाठी महान येथे येत असून, एका एकरासाठी ४ हजार रुपये मजुरी आकारली जात आहे. याशिवाय ये-जा खर्चही शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. मजुरी दर वाढल्याने शेतकऱ्यांसमोर खर्च व्यवस्थापनाचे आव्हान उभे ठाकले आहे.

कुठे आनंद, कुठे निराशा!

शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कृषितज्ज्ञांच्या मते, वेळेवर पेरणी, रोगनियंत्रण उपाययोजना व शिफारसीय वाणांचा वापर केल्यास उत्पादनात स्थैर्य मिळू शकते. सध्या परिसरात 'कुठे आनंद, तर कुठे निराशा' अशी स्थिती दिसून येत आहे.

प्रतिएकर १ हजार रुपयांची वाढ

अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याची चर्चा गतवर्षी एकरी सोंगणीचा दर सुमारे ३ हजार रुपये होता. त्या तुलनेत यंदा प्रतिएकर १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. वाढत्या मजुरीमुळे उत्पादन खर्चात लक्षणीय वाढ झाल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांवर आहे.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

Web Title : चने की फसल पर रोग का प्रकोप: किसानों के लिए अलग-अलग उपज

Web Summary : अकोला के किसान चने की पैदावार में मिश्रित भाग्य का सामना कर रहे हैं। जल्दी बुवाई से अच्छी उपज हुई, लेकिन देर से बोई गई फसलें बीमारी से ग्रस्त हो गईं, जिससे भारी नुकसान हुआ। उच्च श्रम लागत से किसानों की परेशानियाँ बढ़ गई हैं।

Web Title : Chickpea Crop Hit by Disease: Varied Yields for Farmers

Web Summary : Akola farmers face mixed fortunes with chickpea yields. Early sowing yielded well, but late-sown crops suffered from disease, causing significant losses. High labor costs add to farmers' woes.