Lokmat Agro >शेतशिवार > जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त?

जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त?

How will farmers benefit from the GST cut? What will be cheaper? | जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त?

जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना कसा होणार फायदा? काय काय होणार स्वस्त?

जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास २२ मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच सप्टेंबरपासून स्वस्त होतील.

जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास २२ मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच सप्टेंबरपासून स्वस्त होतील.

शेअर :

Join us
Join usNext

जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास २२ मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच सप्टेंबरपासून स्वस्त होतील. त्यामुळे यंदाची दिवाळी खरेदी जोरदार होईल विमांच्या प्रीमियमवर जीएसटी नसेल.

यात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, शेती, बागायती किंवा वनीकरण यंत्रे, जमिनीची तयारी/शेती यंत्रे, कापणी यंत्रे, कंबाइन हार्वेस्टर, पिक कापणी मशीन, गवत कापणी यंत्र, कंपोस्टिंग मशीन इत्यादींवर जीएसटी दर १२% वरून ५% करण्यात आला आहे.

शेतकरी वापरत असलेले ट्रॅक्टरचे स्पेअर पार्ट्स, टायर, ट्यूब, व्हील रिम, ब्रेक, गिअर बॉक्स, क्लच असेंब्ली, रेडिएटर, सायलेंसर, फेंडर, हूड, कूलिंग सिस्टिम इत्यादींवर जीएसटी १८% वरून ५% दर करण्यात आला आहे.

हात पंप, स्प्रिंकलर, ड्रिप सिंचन प्रणालीसठी जीएसटी १२% वरून ५% दर लागू केला आहे. शेतकऱ्यांसाठी सेल्फ-लोडिंग ट्रेलर्स व हाताने चालणारी वाहने (हातगाडी, रिक्शा, प्राणी-ओढ गाडी) यांना जीएसटी १२% वरून ५% दर लागू केला आहे.

ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणांवरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी घेण्यात आला आहे. जीएसटीमधील कपातीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर आणि इतर शेतीशी संबंधित उपकरणे अधिक परवडणारी होणार आहेत.

खते, रासायनिक व जैविक कीटकनाशके
◼️ रासायनिक खते व सूक्ष्म पोषक तत्वांवर दर कपात.
◼️ सल्फ्युरिक ऍसिड, नाइट्रिक ऍसिड, अमोनिया इत्यादींवर जीएसटी दर १८% वरून ५% करण्यात आला आहे.
◼️ जिबरेलिक ऍसिड, सूक्ष्म पोषक द्रव्यांवर जीएसटी १२% वरून ५% दर करण्यात आला आहे.
◼️ जैविक कीटकनाशके यांवर जीएसटी १२% वरून ५% दर लागू केला आहे.

शेतीवरील अन्य सवलती
◼️ कंपोस्टिंग मशीन, बायोगॅस प्लांट, सौर ऊर्जा उपकरणे व शेतीसाठी वापरली जाणारी अन्य उपकरणे यांवर जीएसटी दर १२% वरून ५% करण्यात आला आहे.
◼️ शेती ट्रॅक्टरसाठी सर्व स्पेअर पार्ट्स आणि सर्व कृषी डिझेल इंजिन पार्ट्स यांवर दर कपात करण्यात आली आहे.
◼️ बायोसायन्स व ड्रिप सिंचन उपकरणांना जीएसटी सवलत मिळाली आहे.

शेतकऱ्यांसाठी साधन सामग्री
शेती व कृषी प्रक्रियांसाठी आवश्यक सामग्री जसे मातीची तयारी, कापणी, सिंचन, वाहतूक, ट्रॅक्टर व त्याचे पार्ट्स, बायोगॅस-सौर यंत्रणा, ट्रेलर, स्व-लोडिंग वाहने इत्यादींना आता कमी दराने जीएसटी लागू आहे.

अधिक वाचा: सातबाऱ्यावरील इतर हक्कातील व्यक्तींना मिळकतीत हिस्सा मिळतो का? जाणून घ्या सविस्तर

Web Title: How will farmers benefit from the GST cut? What will be cheaper?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.