lokmat Supervote 2024
Lokmat Agro >शेतशिवार > कांद्यावर पिळ्या आणि केवडा रोग म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान, असा करा बंदोबस्त

कांद्यावर पिळ्या आणि केवडा रोग म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान, असा करा बंदोबस्त

How to manage the twister & downy mildew disease in onion crop? | कांद्यावर पिळ्या आणि केवडा रोग म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान, असा करा बंदोबस्त

कांद्यावर पिळ्या आणि केवडा रोग म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान, असा करा बंदोबस्त

कांदा पिकात प्रामुख्याने करपा रोगानंतर पीळ प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते.  

कांदा पिकात प्रामुख्याने करपा रोगानंतर पीळ प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते.  

शेअर :

Join us
Join usNext

कांदा आणि लसूण या पिकात प्रामुख्याने करपा रोग मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचप्रमाणे मर, केवडा, साठवणूकीतील जीवाणूंमुळे होणारी सड, कांदा काजळी, मानसड, पांढरीसड, इत्यादी रोग आढळून येतात. रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटीकेपासून ते काढणीपर्यंत काळजी घ्यावी लागते. त्याचप्रमाणे काढणीनंतर कांदा साठवणूकीत ठेवण्यापूर्वी त्याची काळजी घेवून चांगल्या रितीने वाळविणे अत्यंत महत्वाचे असते.

ट्विस्टर/करपा/पिळ्या रोग
कांदा पिकावर ट्विस्टर रोगाचा प्रादूर्भाव प्रामुख्याने खरीप २०१८ पासून आढळून येत आहे. ट्विस्टर रोग हा फ्युजॅरियमचा प्रादूर्भाव प्रामुख्याने रोपवाटिकेत आढळून येतो. ट्विस्टर या रोगामध्ये कांद्याच्या पानांचा पिळ पडलेला आढळून येतो. म्हणून स्थानिक भाषेत त्याला कांदयावरील पिळ्या रोग असेही म्हणतात. या रोगामध्ये कांद्याच्या पानांना पीळ पडलेला आढळून येतो व पानाच्या तळाशी आपणास कोलीटोट्रिकम बुरशीच्या प्रादूर्भाची लक्षणे आढळून येतात.

कांद्याच्या माना ह्या लांबलेल्या दिसतात व भारी जमिनीत जास्त प्रमाणात आढळून येते. तसेच कांदा हा गोलाकार न वाढता लांबुळका व सिलेंडरप्रमाणे लांबलेला दिसतो तसेच मुळे पाहिली असता त्यात गुलाबी रंगाच्या छटा आढळून येतात. ज्या फ्युजॅरियमच्या प्रादूर्भावामूळे विशेषत: आढळतात. ट्विस्टर रोगाचा प्रादूर्भाव हा जुलै महिन्यात पुर्न लागवड केलेल्या कांद्यावर जास्त आढळून येतो. ऑगस्ट महिन्यानंतर पूर्नलागवड केल्यास या रोगाचा प्रादूर्भाव कमी आढळून येतो. परंतू ८ ते १० दिवस सतत रिमझिम पाऊस सुरु असल्यास या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.

उपाय
- रोपवाटिकेपासून काळजी घेणे आवश्यक असते तसेच नर्सरीत ट्रायकोड्रर्मा व पॅसिलोमायसिसचा वापर केल्यास फ्युजॅरियम व निमॅटोड नियंत्रणास मदत होते.
- रोपवाटिका गादी वाप्यात ३x१ मी आकाराची करुन बियाणे काकरी पाडून सरळ रेषेत पातळ टाकावे.
- बीजप्रकीया करणे आवश्यक आहे त्यासाठी ट्रायकोड्रर्मा व पॅसिलोमायसिस ५ ग्रॅम/किलो बियाणे या प्रमाणात करावी.
- रोगाचा प्रादूर्भाव दिसून येताच मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डॉझिम १० ग्रॅम १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
- मर रोगाच्या नियत्रंणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम १० लिटर प्रमाणे जिरवण करावी.
- रोपांची पूर्नलागवड करतेवेळी कार्बेन्डॉझिम १० ग्रॅम किंवा कॉपर अॉक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा ट्रायकोड्रर्मा ५० ग्रॅम+ पॅसिलोमायसिस ५० ग्रॅम प्रति १० लिटर या प्रमाणात घेऊन त्यात रोपांची मुळे ५ ते १० मिनिटे बुडवून लागवड करावी.
- रोगाचा प्रादूर्भाव वाढत असल्यास टेब्युकोनॅझोल १० मिली किंवा ॲझोक्झिस्ट्रॅाबीन १० मिली + १० मिली स्टिकर प्रति १० लिटर प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार ८-१० दिवसांच्या अंतराने २-३ फवारणी कराव्यात.

अधिक वाचा: करपासारखे रोग करतात कांद्याचं मोठं नुकसान, उत्पादनातही बसतो फटका, असे करा उपाय
 
केवडा (डाऊनी मिल्डयू)
पेरोनोस्पोरा डिस्ट्रक्टर बुरशीच्या प्रादूर्भावामुळे आर्द्र हमामानात सुरवातीस पानावर फिकट हिरवट-पिवळसर चट्टे पडतात. नंतर अती दमट हवामानात केवड्याची वाढ होवून पांढरट ते जांभळट चट्टे पडून रोग पूर्ण पानावर पसरतो. पानाचे शेंडे जळतात यामुळे झाडाची वाढ खुंटून चिंगळी काद्याचे प्रमाण वाढते. रोगग्रस्त कांद्याच्या बियाण्याची लागवड केल्यास प्रथम पानावर या बुरशीची वाढ होवून त्याचा दुय्याम प्रसार वारा व पाणी यामुळे होतो.

उपाय
-
जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
- पिकाची फेरपालट करावी.
- रोगग्रस्त काद्यांची बियाण्यासाठी लागवड करु नये.
- रोगाची लक्षणे दिसताच मँकोझेब किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड २५-३० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून १० दिवसाच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात. रोगाचे प्रमाण वाढल्यास मेटॅलॅक्झिल एम.झेड-७२, २५ ग्रॅम किंवा फोसेटील २० ग्रॅम/मँकोझेब २० ग्रॅम प्रती १० लि. पाण्यातून ७-१० दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.

डॉ. आर.बी.सोनवणे, प्रा. आर.एम.बिराडे
कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव ब., ता. निफाड, जि.नाशिक

Web Title: How to manage the twister & downy mildew disease in onion crop?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.