Join us
Daily Top 2Weekly Top 5

भात पिकावरील लष्करी अळीचे व्यवस्थापन कसे कराल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 09:44 IST

भाताची हळवी वाणं दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. तसेच काही कापणीस तयार आहेत अशा ठिकाणी भाताच्या लोंब्यांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे.

सद्य परिस्थितीत पावसाने दिलेली उघडीप आणि ऑक्टोबर महिन्यातील वाढते तापमान या बाबी लष्करी अळीच्या वाढीस अनुकूल असल्याने या अळीचा उद्रेक काही ठिकाणी भातपीक क्षेत्रावर दिसत आहे. विशेषतः भाताची हळवी वाणं दाणे भरण्याच्या अवस्थेत आहेत. तसेच काही कापणीस तयार आहेत अशा ठिकाणी भाताच्या लोंब्यांवर या किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे.

ही कीड ज्याठिकाणी भातखाचरात पाणी नाही तेथे भाताच्या चुडामध्ये, जमिनीला पडलेल्या भेगांमध्ये किंवा बांधावरील गवतामध्ये लपून राहते आणि रात्रीच्या वेळेस भातरोपांतर र चढून अधाशाप्रमाणे लोंब्या कुरतडते. यामध्ये लोंब्या खाण्यापेक्षा त्या कुरतडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर भात शेतात दाण्यांचा सडा पडल्याचे दिसते. ही कीड एका रात्रीत बऱ्याच क्षेत्रावरील भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. तेव्हा या किडीचा प्रादुर्भाव दिसताक्षणी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

व्यवस्थापन कसे कराल?१) जे भातपीक तयार असेल अशा पिकाची वैभव विळ्याच्या सहाय्याने तत्काळ कापणी करावी. तसेच ताबडतोब शेताची नांगरट करावी.२) ज्या भातशेतीमध्ये पाण्याची उपलब्धतता असेल, अशा ठिकाणी प्रादुर्भावित भात शेतामध्ये पाणी बांधून ठेवावे. जेणेकरून अळ्या जमिनीत किया चूडामध्ये न लता रोपांवर आल्याने पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतील. तेव्हा त्याकरीता भातशेतीमध्ये पक्षी थांबे उभारावेत.३) ज्या भातशेतीमध्ये या किडीचा उद्रेक झालेला. असेल, अशा ठिकाणी भातशेतीच्या भोवती चर खोदून पाणी भरून ठेवावे म्हणजे अळ्यांचे एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये स्थलांतर होणार नाही.४) या किडीच्या व्यवस्थापनाकरिता सायंकाळी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ६.२५ मिली किंवा सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही ६ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. ही कीटकनाशके परिणामकारक आहेत. मात्र, लेबलक्लेम नाहीत, (पॉवर स्प्रेअरने फवारणी करताना किटकनाशकांची मात्रा दुप्पट घ्यावी.)५) या किडीच्या व्यवस्थापनासाठी सर्व शेतकन्यांनी सामूहिक मोहीम राबविल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील.

डॉ. एस. सी. वरवडेकरव्यवस्थापक, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र , कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

टॅग्स :कीड व रोग नियंत्रणविद्यापीठशेतकरीपीकशेतीकोकणपाऊस