Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांना वार्षिक किती कांदा लागतो? जाणून घ्या संपूर्ण गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 16:26 IST

देशाची कांद्याची गरज कशी भागते? भारतीयांना किती कांदा लागतो? अपेक्षित भाव नाही, तरीही शेतकरी का कांदा उत्पादन घेतात? असे प्रश्न तुम्हाला ही पडले असतील तर ही माहिती तुमच्यासाठी.

देशाची कांद्याची गरज कशी भागते?

■ कांद्याची देशभरात एक साखळी असते. दक्षिण भारतातून कांद्याचे उत्पादन सुरू होते. १५ ऑगस्टपासून कांदा येण्यास सुरुवात होते.

■ नागपंचमीनंतर आपल्याकडे कांदा लागवड सुरू होते. सप्टेंबरनंतर महाराष्ट्रातील सोलापूर, चाकण या पश्चिम महाराष्ट्रातील पट्ट्यातून कांदा बाजारात येतो. त्याबरोबर कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातून कांद्याचे उत्पादन सुरू होते.

■ त्यानंतर उर्वरित महाराष्ट्रातून विशेष नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांतून कांदा बाजारात येतो. एकेकाळी चार राज्यांत होणारे कांद्याचे उत्पादन आता २४ राज्यांत होते.

भारतीयांना किती कांदा लागतो?

• देशात सरासरी ३०० मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते.

• भारतीयांना वर्षाला १५० मेट्रिक टन कांदा लागतो.

• ५० लाख मेट्रिक साधारणपणे निर्यात होते.

• १०० मेट्रिक टन कांदा सरप्लस राहतो.

अपेक्षित भाव नाही, तरी...

■ अतिवृष्टी, दुष्काळ या घटकांचा कांदा पिकाला फटका बसतो. कधी अतिवृष्टीने नुकसान, तर कधी दुष्काळामुळे पीक येत नाही.

■ मात्र, त्यातून उत्पादन घसरले की निर्यातबंदी लादली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नाही.

■ एकरी १५० क्विंटल पीक घेतले. क्विंटलला साधारण हजार रुपये भाव मिळाला तरी ८० ते ९० हजार रुपये खर्च जाऊन शेतकऱ्याला ६० हजार रुपये मिळतात. मात्र, त्यासाठी सर्व कुटुंबाचे कष्ट असतात.

■ कांद्याच्या तुलनेत गहू, हरभरा, मका या पिकांतून शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नाही.

निर्यातीसाठी नव्या बाजारपेठा कधी शोधणार?

भारतातून प्रामुख्याने आखाती देश, मलेशिया येथे कांदा निर्यात होते. युरोपात आपला कांदा जात नाही. त्यासाठी गेल्या काही वर्षात विशेष प्रयत्नही झालेले नाहीत. तसेच द्राक्षाप्रमाणे युरोपात कांदा निर्यातीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे.

हेही वाचा - पिंपरखेडच्या शिक्षित तरुणाने फूलशेतीतून शोधला रोजगार; पॉलीहाऊसमधील जरबेरा देतोय आर्थिक साथ

टॅग्स :कांदाशेतकरीशेतीशेती क्षेत्रबाजारनाशिक