Join us
Daily Top 2Weekly Top 5

तोडणी-वाहतूक खर्च वजा जाता ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या हातात यंदा किती रुपये येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:48 IST

दोन-तीन साखर कारखाने सोडले तर इतर कारखान्यांचा साखर उतारा साडेनऊ व त्यापेक्षा कमी असतो ही मागील काही वर्षांची आकडेवारी सांगते.

सोलापूर : जिल्ह्यातील दोन-तीन साखर कारखाने सोडले तर इतर कारखान्यांचा साखर उतारा साडेनऊ व त्यापेक्षा कमी असतो ही मागील काही वर्षांची आकडेवारी सांगते.

तोडणी-वाहतूक वजा करून शेतकऱ्यांना द्यावयाच्या रकमेचा विचार केला असता यंदा टनाला हक्काचे अडीच हजार रुपये ऊसउत्पादकांना मिळणार आहेत.

साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी ११ नोव्हेंबर रोजी मागील वर्षी गाळप घेतलेल्या २०० साखर कारखान्यांचा तोडणी-वाहतूक खर्च कळविला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, विठ्ठलराव शिंदे करकंब व विठ्ठल गुरसाळे या साखर कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा अधिक असतो.

लोकनेते बाबूराव पाटील किंवा आणखीन एखाद्या साखर कारखान्याचा साखर उतारा १० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. इतर ३० पेक्षा अधिक साखर कारखान्यांचा साखर उतारा साडेनऊ व त्यापेक्षा कमी असतो. साखर उताऱ्याबाबत यंदा यापेक्षा वेगळी परिस्थिती असेल असे नाही.

एफआरपी कायद्यानुसार साडेनऊ व त्यापेक्षा कमी साखर उतारा पडला तरी साडेनऊ टक्के उतारा ग्राह्य धरून ३२९० रुपये ५० पैसे प्रतिटन ऊस दर शेतकऱ्यांना देणे बंधनकारक आहे.

मात्र, या रकमेतून तोडणी-वाहतूक खर्च वज करून 'एफआरपी'ची रक्कम द्यावयाची आहे. १०.२५ टक्के साखर उताऱ्यास प्रतिटन ३,५५० रुपये दर देणे साखर कारखान्यांवर बंधनकारक असून त्यामधून तोडणी-वाहतूक वजा करायची आहे.

सर्वात कमी तोडणी-वाहतूक खर्च संत दामाजी साखर कारखाना मंगळवेढा तर राजवीची (भैरवनाथ आलेगाव) तोडणी वाहतूक सर्वाधिक ११०८ रुपये इतकी आहे.

मागील वर्षाच्या साखर उताऱ्याप्रमाणे होणाऱ्या रकमेतून मागील वर्षांचा तोडणी-वाहतूक खर्च वजा करून यंदा एफआरपी ठरवली जाणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाचा आदेश समोर ठेवला आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च (₹)लोकमंगल माउली - १२८४राजवी अ‍ॅग्रो (जुना भैरवनाथ आलेगाव) - ११०८शंकर, सदाशिवनगर - १०९८येडेश्वरी, खामगाव -१०९५ भैरवनाथ, लवंग - १०८९धाराशिव (जुना सांगोला) - १०८८सिद्धनाथ शुगर - १०५४युरोपियन शुगर - १०५१सिद्धेश्वर, सोलापूर - १०४८इंद्रेश्वर, उपळाई - १०४०अवताडे शुगर - १०३६स.शि. वसंतराव काळे - १०२२लोकमंगल, बीबीदारफळ - १०२२सीताराम महाराज, खर्डी - १०१४बबनराव शिंदे, तुर्कपिंपरी - १००९ओंकार (विठ्ठल कॉर्पोरेशन) - १०००लोकमंगल, भंडारकवठे - ९९५मातोश्री, लक्ष्मी शुगर - ९९५ओंकार, चांदापुरी - ९९२भीमा सहकारी - ८८२आष्टी शुगर, मोहोळ - ९७९श्री संत कुर्मदास - ९७५जयहिंद, आचेगाव - ९७४लोकनेते बाबूराव पाटील - ९७२स. म. शंकरराव मोहिते-पाटील - ९७०ओंकार शुगर (व्ही.पी.) - ९६८गोकुळ धोत्री - ९५६श्री पांडुरंग, श्रीपूर - ९५६सासवड, माळीनगर - ९४४विठ्ठलराव शिंदे करकंब - ९४४जकराया वटवटे - ९४२विठ्ठल गुरसाळे, पंढरपूर - ९९४विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर - ९०४श्री संत दामाजी - ८६०(मागील वर्षी गाळप हंगामघेतलेल्या साखर कारखान्यांची तोडणी-वाहतूक खर्च)

अधिक वाचा: जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Farmers to Get ₹2500/Ton Sugarcane After Deduction: Report

Web Summary : Solapur sugarcane farmers will receive ₹2500 per ton after deducting harvesting and transport costs. Sugar recovery rates are generally low, but farmers are guaranteed ₹3290.50/ton based on a 9.5% recovery rate as per FRP norms. Actual deductions vary by factory, with some having significantly higher costs.
टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीशेतीसोलापूरउच्च न्यायालयपंढरपूर