उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. दुपारच्या जेवणानंतर तर काही जण रात्रीच्या जेवणानंतर ताक पितात. पण ताक प्यायल्यानं प्रत्येकालाच फायदा होतोच, असं नाही.
उन्हाळ्यात ताक कोणी, कसं आणि किती प्यावं. पचन सुधारण्यापासून ते डिहायड्रेशन रोखण्यापर्यंत, उन्हाळ्यात ताकाचे फायदे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत एक उत्तम भर घालतात. दररोज ताक पिल्याने आरोग्याला का मदत होते का हे आपण पाहूया.
उन्हाळ्यात काही जण प्लेन ताक पितात तर काही जण त्यात जीरं घालून किंवा मसाले घालून मसाला ताक पितात. दुपारच्या जेवणानंतर तर काही जण रात्रीच्या जेवणानंतर ताक पितात. पण ताक प्यायल्याने प्रत्येकाला फायदा होतोच, असं नाही.
प्रत्येकाचे शरीर उद्भवणारे त्रास हे वेगळे असतात. त्यामुळे सरसकट ताक न पिता ताक पिताना काही बदल करणं आवश्यक आहे. आयुर्वेदात प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या प्रकृतीनुसार ताकाचे सेवन वेगेतगळे असते.
पित्त प्रकृती असलेल्यांनी ताक कसे प्यावे?◼️ उन्हाळा तीव्र उष्णता, निर्जलीकरण आणि पचनक्रियेतील त्रास घेऊन येतो.◼️ बरेच लोक थंड आणि निरोगी राहण्यासाठी साधे, नैसर्गिक मार्ग शोधतात. एक पारंपारिक पेय जे वेगळे दिसते ते म्हणजे ताक.◼️ हलके, ताजेतवाने आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेले ताक हे पिढ्यानपिढ्या उन्हाळ्यातील एक विश्वासार्ह साथीदार राहिले आहे.◼️ पित्त प्रकृती असलेल्यांनी एक चिमूटभर खडीसाखर मिसळून ताक प्यायला हवं.◼️ पित्त शरीरात उष्णता तयार करतं आणि त्यामुळे जळजळ, अॅसिडिटी होऊ शकते.◼️ ताक आणि खडीसारखेरचं मिश्रण शरीराला थंड ठेवण्यास मदत करतं.
कफ प्रकृती असलेल्यांनी कसे ताक प्यावे?◼️ कफ प्रकृती असलेल्यांनी ताकात एक चिमूटभर सुंठ मिसळून प्या.◼️ यामुळे ताक प्यायल्यानंतर लगेच कफ निघणार नाही.◼️ घसा दुखणं, नाक बंद होणं अशा समस्या उद्भवणार नाहीत तसंच पचन अग्नी मंद होणार नाही.◼️ आयुर्वेदानुसार कोणत्याही पेय किंवा खाद्यपदार्थांचा प्रभाव कोणत्याही व्यक्तीवर समान होत नाही.◼️ योग्य पद्धतीनं सेवन केल्यास कोणताही पदार्थ औषधाप्रमाणे काम करतो.◼️ म्हणून शरीराचे दोष आणि प्रवृत्ती लक्षात घेऊनच पदार्थांचे सेवन करावे. जेणेकरून पचन संतुलित राहण्यास मदत होईल.
वात असलेल्यांनी ताक कसे प्यावे?◼️ वात प्रकृती असलेल्यांनी थंड ताक थेट पिण्याऐवजी ताक १ चिमूटभर सैंधव मीठ घालून प्यायला हवं.◼️ असं केल्यानं पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत तसंच पचनक्रियाही चांगली राहते.◼️ अनेकदा ताक प्यायल्यानंतर लोक लगेचच शौचास जातात.◼️ सैंधव मीठ किंवा काळं मीठ घालून ताक प्यायल्यानं ही समस्या कमी होते तसंच पाचनअग्नी मजबूत राहतो.◼️ योग्य पद्धतीनं प्यायल्यास वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष संतुलित ठेवण्यासाठी ताक लाभदायक ठरते.
अधिक वाचा: पीएम किसानचा हप्ता न मिळाल्यास काय कराल? कशी तपासाल लाभार्थी यादी? जाणून घ्या सविस्तर
Web Summary : This summer, tailor buttermilk consumption to your body type (Vata, Pitta, Kapha) for optimal health. Adding ingredients like ginger, sugar, or salt enhances digestion and balances doshas. Drink right for maximum benefits.
Web Summary : इस गर्मी में, अपने शरीर के प्रकार (वात, पित्त, कफ) के अनुसार छाछ का सेवन करें ताकि स्वास्थ्य बेहतर रहे। अदरक, चीनी या नमक जैसे तत्व मिलाने से पाचन क्रिया बेहतर होती है और दोषों का संतुलन बना रहता है। अधिकतम लाभ के लिए सही तरीके से पिएं।