Join us

राज्यातील 'या' भागात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान; पिक नुकसान पंचनाम्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 16:29 IST

pik panchnama मे महिन्यासह १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४८५.५ मि.मी. पाऊस पडला असून, उत्तर तालुक्यात सर्वाधिक ६८४ मि.मी. इतका पाऊस नोंदला आहे.

सोलापूर : मे महिन्यासह १४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४८५.५ मि.मी. पाऊस पडला असून, उत्तर तालुक्यात सर्वाधिक ६८४ मि.मी. इतका पाऊस नोंदला आहे.

जिल्ह्याचा जून ते सप्टेंबर या कालावधीचा सरासरी पाऊस ४८१ मि. मी. असला तरी मे महिन्यासह एकूण ४८६ मि.मी. पाऊस झाला आहे.

दरम्यान, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यातील सात मंडळांतील पीक नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ऑगस्ट महिन्यात सुरुवातीला चार दिवस पाऊस जाणवला नाही. मात्र, त्यानंतर दररोजच पडत आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यात हा पाऊस नुकसानीचा ठरत आहे.

मे महिन्यात जिल्ह्यात एकूण २३३ मि.मी. तर जून, जुलै व १३ ऑगस्टपर्यंत एकूण २५२ मि.मी. असा मे ते ऑगस्टपर्यंत एकूण ४८५.५ मि.मी. इतका पडला आहे.

उत्तर सोलापूरमध्ये १४ हजार हेक्टर पिकांचे नुकसान◼️ ऑगस्ट महिन्यात उत्तर तालुक्यातील सर्वच पाच, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी, मुस्ती व अक्कलकोट तालुक्यातील किणी मंडळात अतिवृष्टी झाली आहे.◼️ या मंडलातील पीक नुकसानीचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना मागणी केली आहे.◼️ उत्तर तालुक्यात १४ हजार हेक्टर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाने कळवली आहे.◼️ प्रत्यक्षात पीक नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर शेतकरी संख्या, पीक हेक्टर व पिकांची नावे स्पष्ट होणार आहे.

पुढेही राहणार पाऊस◼️ मे महिन्यात व नंतरही उत्तर तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला आहे व दररोज पडत आहे.◼️ उत्तर तालुक्यात मे व नंतर ६८४ मि.मी. पाऊस पडला आहे.◼️ उत्तर तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात ४५२ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, त्यापेक्षा अधिक पडला आहे.◼️ सोलापूर जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ४८१ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे.◼️ आणखीन पावसाळा दीड महिना व परतीचा पाऊस पुढे आहे. त्यामुळे यात आणखीन पावसाची भर पडणार आहे.

अधिक वाचा: e Pik Pahani : आता पिक पाहणी होणार झटपट; वापरा अपडेटेड व्हर्जनचे 'हे' मोबाईल अ‍ॅप

टॅग्स :पीकपाऊसशेतीशेतकरीसोलापूरसरकार