Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्ट फेल्युअरचा धोका कमी करणारे हृदयाच्या आकारचे 'हे' पान ठरले संशोधनात बहुगुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 16:00 IST

heart disease 'या' वनस्पतीच्या पानांत बाष्पशील तेलांसह अमिनो अ‍ॅसिड, कार्बोहायड्रेट, आदी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट, दाहशामक घटक आढळतात.

दुर्गेश मोरेपुणे: हार्ट फेल्युअर आजारावर पारंपरिक भारतीय वनस्पती असलेल्या विड्याच्या पानांचा (नागवेलीचे पान) पूरक उपचार म्हणून सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

असे महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुण्यात करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहेत. हे संशोधन आहारतज्ज्ञ डॉ. स्वाती खारतोडे यांनी पुणे येथे डिसेंबर २०२३ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत केले.

२४२ हार्ट फेल्युअर रुग्णांवर दोन वर्षे तुलनात्मक संशोधन◼️ या अभ्यासात २४२ हार्ट फेल्युअर रुग्णांचा समावेश केला होता.◼️ यापैकी सुमारे ५० टक्के रुग्णांची अ‍ॅन्जिओप्लास्टी झालेली होती व सर्व रुग्ण तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नियमित औषध घेत होते.◼️ एका गटाला केवळ औषधोपचार, दुसऱ्या गटाला औषधोपचारांसोबत विड्याची पाने, २ ओल्या नारळाचा गर व थोडी वेलची किंचा वाळवलेल्या विड्याच्या पानांची कॅप्सूल असा पूरक आहार १२ आठवड्यांसाठी दिला. (त्यात चुना, कात, सुपारी, गुलकंद यांचा समावेश नव्हता.)◼️ अभ्यासाअंती असे आढळून आले की, विड्याचे पान सेवन करणाऱ्या गटातील २० टक्के रुग्णांमध्ये इंजेक्शन फ्रॅक्शन ५० टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच सामान्य मर्यादेत आले.

'तांबूल' संशोधनाचा आधार◼️ विड्याच्या पानांत बाष्पशील तेलांसह अमिनो अ‍ॅसिड, कार्बोहायड्रेट, आदी जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट, दाहशामक घटक आढळतात.◼️ भारतीय परंपरेत' तांबूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पानाला औषधी महत्त्व आहे.◼️ नारळ व वेलची यांचा समावेश पोषणमूल्य वाढवण्यासाठी करण्यात आला.◼️ या संशोधनाच्या महत्त्वाची दखल घेत आयुष मंत्रालय, दुबई यांनी डॉ. स्वाती खारतोडे यांना हा अभ्यास आंतरराष्ट्रीय मंचावर सादरीसाठी आमंत्रित केले आहे.

'हा उपाय औषधांचा पर्याय नसून, पूरक म्हणून वापरला आहे. भविष्यात दीर्घकालीन संशोधनाची गरज आहे.' या अभ्यासासाठी आयुर्वेदातील ग्रंथसंपदेबाबत माहितीसाठी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. सचिन गांधी, तर सांख्यिकीय विश्लेषणासाठी अदिती देशपांडे यांनी सहकार्य केले. - डॉ. स्वाती खारतोडे

अधिक वाचा: थंडीच्या दिवसात आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर करतंय 'हे' एक फळ; जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Betel leaf reduces heart failure risk, research reveals benefits.

Web Summary : Research suggests betel leaf may help heart failure patients. A study showed improved heart function in patients using betel leaf alongside medication. More research is needed.
टॅग्स :हृदयरोगहृदयविकाराचा झटकाइनडोअर प्लाण्ट्सविज्ञानऔषधंऔषधंआरोग्यहेल्थ टिप्सडॉक्टरपुणे